Pune Minor Delivery Case: पुण्यात धक्कादायक प्रकार; १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात एकटीने प्रसूती

नवजात बाळाची नाळ स्वतः कापली; तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
POCSO
POCSOPudhari
Published on
Updated on

पुणे: खेळण्याचे असताना १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटीने प्रसूती केल्याची हृदयद्रावक घटना पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कोणतीही वैद्यकीय मदत नसताना वेदनांनी विव्हळलेल्या या मुलीने स्वतःच नवजात बाळाची नाळ कापल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

POCSO
Pune Deputy Mayor Parshuram Wadekar: पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर; चळवळीतील कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास

या प्रकरणी आदिल शेख (२४) याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विवाहित मोठी बहीण माहेरी आली असता घराचा दरवाजा आतून बंद होता.

POCSO
Pune mayor Manjusha Nagpure: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे बिनविरोध; विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला

काही वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर दरवाजा उघडण्यात आला. घरात प्रवेश करताच फरशीवर आणि दरवाजाजवळ रक्ताचे डाग दिसून आले. खिडकीजवळ कापडात गुंडाळलेले नवजात बाळ दिसले. याप्रकारामुळे कुटुंबीयांना धक्‍काच बसला. तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर मुलीने घरातच प्रसूती झाल्याचे सांगितले.

POCSO
Pune Municipal Mayor Election: महापौर निवडणुकीत काँग्रेसची माघार, भाजपला बिनविरोध वाटचाल

नाळ कोणी कापली, असे विचारल्यावर तिनेच स्वतः ती कापल्याची कबुली दिली. वेदना, भीती आणि सामाजिक दबावाच्या छायेत तिने एकटीने हा प्रसंग झेलल्याचे उघड झाले. नंतर आई व आत्यासमोर मुलीने गेल्या वर्षभरापासून आदिल शेख याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. या काळात दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध झाल्याचेही तिने नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

POCSO
Mulshi Election Result: मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

अल्पवयीन असल्याने हा संबंध कायद्याने गुन्हा ठरत असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. सध्या आई आणि नवजात बाळ दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. पोलिस उपनिरीक्षक निकिता उईके या तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news