Pune Tree Count: पुण्यात 57 लाखांहून अधिक वृक्षांची नोंद; धनकवडी-सहकारनगर हरित शिरोमणी

महापालिकेच्या वृक्षगणनेत उपनगरांनी बाजी मारली; भवानी पेठेत झाडांची कमतरता चिंताजनक
Tree Plantation
Tree PlantationPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे आपले पुणे शहर आता निसर्गाच्या एका आगळ्यावेगळ्या वरदानाने बहरले आहे. सिमेंटच्या जंगलातही पुण्याचे निसर्गप्रेम आणि ‌‘हरित वैभव‌’ दिमाखात उभे असल्याचे महानगरपालिकेच्या ताज्या वृक्षगणनेतून समोर आले आहे. संपूर्ण पुणे शहरात तब्बल 57 लाख 81 हजार 578 वृक्षांची मोजणी झाली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Tree Plantation
Purandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद; 920 एकरांसाठी संमती

हे वृक्षराजीचे वैभव पुण्याच्या वैभवात भर घालत आहे. जणू वसुंधरेनेच पुण्याच्या गळ्यात हा हिरवागार शालू पांघरला आहे. या हरित शर्यतीत ‌‘धनकवडी-सहकारनगर‌’ या प्रभागाने बाजी मारली असून, तब्बल 11 लाख 95 हजार 987 वृक्षांसह हा प्रभाग पुण्याचा खराखुरा ‌‘हरित शिरोमणी‌’ ठरला आहे. विस्तीर्ण टेकड्या आणि निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या भागाने निसर्गाचा समतोल राखण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याखालोखाल ‌‘औंध-बाणेर‌’ प्रभागाने 6 लाख 93 हजार 996 वृक्षांचे संगोपन करून आपले ‌‘ग््राीन मॉडेल‌’ सिद्ध केले आहे, तर ‌‘कोथरूड-बावधन‌’ प्रभाग 5 लाख 65 हजार 818 वृक्षांच्या साक्षीने हिरवाईचा श्वास घेत आहे.

Tree Plantation
Pune NEET Paper Leak: पुण्यात NEET पेपरफुटीचे जाळे? ब्युटीपार्लर चालक महिलेसह विद्यार्थी ताब्यात

एकीकडे उपनगरांमध्ये निसर्गाची ही नवलाई नटली असताना पुण्याचा ऐतिहासिक गाभा असलेल्या ‌‘भवानी पेठ‌’ भागात मात्र वृक्षराजीची कमालीची वानवा दिसून येत आहे. या भागात अवघे 12 हजार 582 वृक्ष शिल्लक असून, ही बाब पर्यावरणप्रेमींच्या चिंतेत भर घालणारी आहे. दाट लोकवस्ती आणि व्यावसायिक गजबजाटामुळे या भागाचा ‌‘हिरवा श्वास‌’ काहीसा कोंडला गेला आहे. मध्य वस्तीतील ‌‘कसबा-विश्रामबागवाडा‌’ येथेही अवघ्या 42 हजार 126 वृक्षांची नोंद झाली आहे.

Tree Plantation
PMC Pollution Control Scheme: पुण्यात धूळप्रदूषण नियंत्रणाची योजना कागदावरच; हजारो प्रकल्प नियमांबाहेर

पाच लाखांचा टप्पा पार

शिवाजीनगर, हडपसर आणि नगर रस्ता या भागांनीही पाच लाखांचा टप्पा पार करीत पुण्याच्या हवेत शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा अखंड सुरू ठेवला आहे. येरवडा, कोंढवा आणि धायरी-सिंहगड रस्ता परिसरही या हरित चळवळीत मागे राहिलेला नाही.

‌‘एक घर एक झाड‌’ची संकल्पना आवश्यक

एका बाजूला उपनगरामध्ये वृक्षांची संख्या अधिक असताना भवानी पेठ आणि कसबा पेठ येथे वृक्षांची अल्प नोंद झालेली आहे. आता भवानी पेठ आणि कसब्यासारख्या मध्यवर्ती भागातही ‌’एक घर, एक झाड‌’ ही संकल्पना राबवून पुण्याचा हा हरित शालू आणखी गर्द करण्याची गरज आहे.

Tree Plantation
Daund DJ Clash: राहूत डीजेच्या आवाजावरून रणकंदन; महिलांनी दाखवले धाडस

पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वृक्षांची गणना करण्यात आली आहे. ही गणना क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणे झाली असून, त्यामध्ये भवानी पेठमध्ये सर्वांत कमी वृक्षांची नोंद झाली, तर धनकवडी परिसरात सर्वांत जास्त वृक्षांची नोंद झालेली आहे.

अशोक घोरपडे (मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे महापालिका)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news