Pune Traffic Diversion : पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल, बंद असलेल्या रस्त्यांचे Details

पालखी सोहळ्यानिमित्त बंद असलेले रस्ते : पहाटे ३ ते रात्री ८ पर्यंत
pune traffic diversion ashadhi wari palkhi sohala
Published on
Updated on

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (९ जुलै) बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागातील बहुतांश रस्ते पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येणार आहे.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर एकत्र येतात. नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी), पाटील इस्टेट येथून दोन्ही पालख्या शहरात दाखल होतात. शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गे पालखी सोहळा मुक्कामी दाखल होतो. प्रथेप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहेत.

pune traffic diversion ashadhi wari palkhi sohala
Ashadhi Wari 2026 : आळंदीला न जाता वारकरी थेट पुण्यात दाखल, पालखी सोहळा समिती अन्‌ प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

पालखी सोहळ्यानिमित्त बंद असलेले रस्ते (पहाटे तीन ते रात्री आठपर्यंत)

  • बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी (पर्यायी रस्ता - धानोरी रस्ता, अंतर्गत रस्ते)

  • प्रादेशिक मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक (पर्यायी रस्ता - येरवडा कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता)

  • सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट (पर्यायी रस्ता - पर्णकुटी चौक, मंगलदास चौक, आरटीओ चौक)

  • नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक वाहतूक बंद

  • बोपोडी चौक ते चर्च चौक (पर्यायी रस्ता - बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक, ओैंध रस्ता)

  • पोल्ट्री फार्म चौक, ओैंध, बालेवाडी मार्ग (पर्यायी रस्ता - रेल्वे पोलीस मुख्यालय, ब्रेमेन चैाक)

  • पिंपरी-चिंचवडमार्गे पुणे शहरात येणारी वाहतूक (भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक)

  • शादलबाबा दर्गा, येरवडा ते पाटील इस्टेट, वाकडेवाडी, अभियांत्रिकी महाविद्यालय

  • होळकर पूल ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकी वाहतूक बंद

अभियांत्रिकी महाविद्यालय ते श्री संत तुकाराम पादुका चौक (सकाळी ८ ते रात्री ११)

  • रेंजहिल चौक ते संचेती चौक (पर्यायी रस्ता - रेंजहिल, सेनापती बापट रस्ता, नळस्टाॅप चौक)

  • खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (पर्यायी रस्ता - कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल)

  • गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (पर्यायी रस्ता - कुंभारवेस चौक, आरटीओ चौक)

pune traffic diversion ashadhi wari palkhi sohala
Ashadhi Wari 2026 : वारीसाठी पुणे पोलिसांची 'हायटेक' सुरक्षा व्यवस्‍था

श्री तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (दुपारी १२ ते रात्री ११)

  • फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता

  • डेक्कन ते कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता

  • लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक ते टिळक चौक

  • शनिपार चौक ते सेवासदन चौक

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गाडगीळ पुतळा चौक

  • जिजामाता चौक ते बुधवार चौक

  • नेहरु चौक ते सोन्यामारुती चौक

बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा चौक, पालखी विठोबा मंदिर (दुपारी २ ते रात्री १२)

  • लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक ते सेवासदन चौक

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते बेलबाग चौक

  • लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक

  • देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक

  • सोमवार पेठ पोलीस चौकी ते डुल्या मारुती चौक

  • रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक

पोलिसांच्या सूचना

  • पालखी मार्ग, तसेच लगतच्या मार्गावर १०० मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई

  • पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते टप्याटप्याने खुले

  • पालखी मुक्कामी आल्यानंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल

  • आवश्यकतेनुसार टिळक चौक ते बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात एकेरी वाहतुकीचे निर्बंध तात्पुरते शिथिल

  • पालखी आगमनाच्या दिवशी आळंदी रस्ता, मुंबई-पुणे रस्त्यावर पेट्रोल, डिझेल टँकरवर बंदी

  • परगावाहून येणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news