Pune Crime: मामाच्या मुलीवर लाइन मारल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना 10 वर्षांची शिक्षा

हडपसरमधील 2018 च्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल; प्रत्येकी 51 हजारांचा दंडही ठोठावला
Law
LawPudhari
Published on
Updated on

पुणे: घरासमोर येऊन हॉर्न वाजवीत मामाच्या मुलीवर लाइन मारत असल्याच्या गैरसमजातून तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमुजरी आणि प्रत्येकी 51 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Law
MTDC Summer Tourism Booking Rush: एमटीडीसी रिसॉर्ट्स फुल्ल हाऊस; उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी

अमोल बाळासाहेब बोरकर (वय 33) आणि सागर विजय काळे (वय 33, रा. दोघेही रा. काळेपडळ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. सत्र न्यायाधीश एस. आर. अग््रावाल यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतून 80 हजार रुपये जखमीस देण्यास यावे, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

Law
Rahu Illegal Mining Forest Issue: राहू वनक्षेत्रात अवैध उत्खननाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ही घटना 25 जून 2018 रोजी काळेपडळ परिसरात घडली. प्रतीक सकपाळ (वय 20) असे घटनेतील जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, मारुती सकपाळ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Law
Nira Baramati Road Widening Issue: निरा-बारामती रस्त्याचे काम धुळीच्या विळख्यात; सुरक्षेचा बोजवारा उडाला

प्रतीक हा फिर्यादी मारुती यांचा मुलगा आहे. प्रतीक याचा मित्र हा आरोपीच्या शेजारी राहण्यास आहे. तो मित्राला भेटायला जात असताना घरासमोर हॉर्न वाजवीत होता. यावरून, प्रतीक हा मामाच्या मुलीवर लाइन मारत असल्याचा गैरसमज आरोपींमध्ये निर्माण झाला.

Law
Rahu Khamgaon ZP Election Result: राहू-खामगाव गटात भाजपला धक्का; छुप्या मतदानामुळे राष्ट्रवादीचा विजय

त्यातून आरोपींनी प्रतिकला हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे धारदार शस्त्राने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, आरोपींना अटक करीत दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news