Pune Timber Market Fire: पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव! टिंबर मार्केटमधील 60 दुकाने जळून खाक; नेमकं काय घडलं?

Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून 50 ते 60 दुकाने जळून खाक झाली.
Pune Timber Market Fire
Pune Timber Market FirePudhari
Published on: 
Updated on: 

Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. जय वल्लभ शाळेजवळ असलेल्या लाकडाच्या दुकानांना अचानक आग लागली. या आगीत सुमारे 50 ते 60 दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. लाकडाची दुकाने असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची तब्बल 27 वाहने आणि सुमारे 150 जवान तैनात करण्यात आले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत अनेक दुकानांमधील लाकूड आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Pune Timber Market Fire
DP Road Land Acquisition: मुंढव्यातील बी. टी. कवडे रोड ते भीमनगर रस्त्याचा मार्ग मोकळा; २६ मिळकतधारकांना नोटिसा

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन केले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग कशामुळे लागली, याचा तपास केला जात आहे.

Pune Timber Market Fire
Pune Bhide Bridge Traffic Diversion: पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या पादचारी केबल पुलाच्या कामामुळे वाहतूक वळवली

दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे टिंबर मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे आगीत मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.