Pune Sugar Price: साखर कोटा अपुरा; पुण्यात दरात शंभर रुपयांची वाढ

उन्हाळा व लग्नसराईमुळे मागणी वाढली; भुसार बाजारात मंदीचे वातावरण
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 22 लाख टनांचा साखरेचा कोटा खुला केला आहे. प्रत्यक्षात 24 ते 25 लाख टनांचा कोटा खुला होण्याची अपेक्षा होती. मे महिन्यात कडक उन्हाळा असल्याने शीतपेय उत्पादकांकडून साखरेस मागणी वाढत आहे. तसेच, लग्नसराईचा हंगाम असल्याने देखील साखरेचा खप वाढतो. या महिन्यातील एकूण मागणी लक्षात घेता जाहीर झालेला कोटा अपुरा असल्यामुळे कोट्याच्या घोषणेनंतर येथील घाऊक बाजारात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4100 ते 4150 रुपये इतका होता. मागणी वाढल्यानंतर दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sugar
Chakan Onion Market Price: चाकण बाजारात कांद्याची आवक घटली; तरीही दर घसरले

लहरी हवामानामुळे यंदा उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम भगरवर झाला आहे. भगरीच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हाचा तडाखा आणि सण-उत्सवांचा अभाव या दुहेरी कारणांमुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या मंदीचे वातावरण निर्माण झाले असून सलग दुसऱ्या आठवड्यात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने व्यवहारावर त्याचा थेट परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. गुळाला बाजारात चांगली मागणी असली तरी ऊसाच्या तुटवड्यामुळे अनेक गुऱ्हाळे बंद पडल्याने गुळाची आवक कमी झाली आहे.

Sugar
Pune Fish Market Price: पूर्व किनारपट्टीवरील मासेमारीबंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीतच

परिणामी, कमी पुरवठा असूनही मागणी टिकून असल्याने गुळाचे दर स्थिर राहिले आहेत. दरम्यान, युध्दामुळे संभाव्य टंचाई किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने नागरिकांनी यापूर्वीच धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा केल्यामुळे सध्या बाजारात उठाव कमी झाला असून धान्याचे दर स्थिर आहेत. याशिवाय मागणी आणि पुरवठ्यात समतोल राहिल्यामुळे खाद्यतेल, साबुदाणा, भगर, लाल मिरची आणि नारळ या अत्यावश्यक वस्तूंचे दरही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Sugar
Maharashtra Board New Certificate: राज्य मंडळाचा नवा निर्णय; मार्कशीट आणि प्रमाणपत्र आता एकत्रित

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) 4100-4150 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2250-3100, सरकी तेल 2100-2500, सोयाबीन तेल 2150-2450, पामतेल 2150-2350, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1820-2300 रु. तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4150-5000, एच.एम.टी. कोलम 5300-5600, लचकारी कोलम 6100-6600, चिन्नोर 4500-5000, 1121-11500-12500, आंबेमोहोर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 7000 रु. गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु. बाजरी :- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु.

Sugar
Pune Water Supply: दक्षिण पुण्यात पाणीटंचाईला दिलासा; पाण्याच्या टाक्या कार्यान्वित

गूळ :- गूळ नं. 1 4550-4700, गूळ नं. 2 4350-4500 गूळ नं. 3 4200-4300, बॉक्स 4300-5500 रु. डाळी :- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7650-7800, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये :- हरभरा 6000-6700, हुलगा 5200-5700, चवळी 7900-10500, मसूर 7400-8500, मूग 9500-9800, मटकी गावरान 9600-17000, मटकी पॉलिश 6800-7500, मटकी गुजरात 16000-16500, मटकी राजस्थान 6500-7500, मटकी सेलम 16000-18100, वाटाणा हिरवा 5400-6000, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु. साबुदाणा :- साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :- 13000-14000, सावा भगर 12500-13000 रु. गोटा खोबरे :- 3950-4100 रु. शेंगदाणा :- जाडा 11300-12800, स्पॅनिश11500-12500, घुंगरु 11000-12000 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ :- पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news