Pune Fish Market Price: पूर्व किनारपट्टीवरील मासेमारीबंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीतच

गणेश पेठ बाजारात पश्चिम किनाऱ्यावरून वाढती आवक; मागणी कायम, मटण-चिकन-अंडी दर स्थिर
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारीबंदी लागू झाल्याने गणेश पेठ येथील मासळी बाजारात पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक होत आहे. बाजारात होत असलेल्या मागणीनुसार व्यापारीवर्ग मासळी मागवत आहे. परिणामी, मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Fish
Maharashtra Board New Certificate: राज्य मंडळाचा नवा निर्णय; मार्कशीट आणि प्रमाणपत्र आता एकत्रित

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 3) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 600 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 टन इतकी आवक झाली होती.

Fish
Pune Water Supply: दक्षिण पुण्यात पाणीटंचाईला दिलासा; पाण्याच्या टाक्या कार्यान्वित

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-800, मध्यम : 1400-1500, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-1000, सुरमई 800-1200, रावस : 800-1000, घोळ : 800-1000, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 400-450, भिंग : 400-450, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 900-1100, काळी : 300-400, ओले बोंबील : 350-450.

Fish
Pune Accident: पुण्यात अल्पवयीन चालकाची थार 17 दुचाकींवर आदळली

कोळंबी : लहान : 250-360, मध्यम : 350-500, मोठी : 550-750, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000.

Fish
Doctor Negligence Death: दौंडमध्ये कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान तरुणीचा मृत्यू; निष्काळजीपणाचा आरोप

खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 450-500, तांबोशी : 550-650, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 250-300, शेवटे : 350-400, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-240, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 580, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news