Chakan Onion Market Price: चाकण बाजारात कांद्याची आवक घटली; तरीही दर घसरले

भाजीपाल्याची मोठी आवक; पालेभाज्यांचे दर कडाडले, ५.८० कोटींची उलाढाल
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली. तरीही दरात घसरण झाली. लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, दोडका, गवार व भेंडीची मोठी आवक झाली. फळभाज्यांसह पालेभाज्यांची किरकोळ आवक झाल्याने भाव कडाडले. एकूण उलाढाल 5 कोटी 80 लाख रुपये झाली.

Onion
Pune Fish Market Price: पूर्व किनारपट्टीवरील मासेमारीबंदीचा परिणाम; पुण्यात मासळीचे दर तेजीतच

कांद्याची एकूण आवक 5 हजार क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव 700 ते 1,300 रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,300 रुपयांवरच स्थिरावला. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. लसणाला 12 हजार रुपये कमाल भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 370 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार 500 रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion
Maharashtra Board New Certificate: राज्य मंडळाचा नवा निर्णय; मार्कशीट आणि प्रमाणपत्र आता एकत्रित

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - 5,000 क्विंटल. भाव क्रमांक - 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 700. बटाटा - एकूण आवक - 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे :

टोमॅटो - 292 क्विंटल (2,000 ते 2,500), कोबी - 180 क्विंटल (600 ते 700), फ्लॉवर - 195 क्विंटल (1,000 ते 1,200), वांगी - 74 क्विंटल (2,000 ते 2,500), भेंडी - 82 क्विंटल (2,000 ते 3,000), दोडका - 54 क्विंटल (3,000 ते 3,500), कारली - 64 क्विंटल ( 2,500 ते 3,500), दुधीभोपळा - 52 क्विंटल (1,500 ते 2,000), काकडी - 78 क्विंटल (2,000 ते 2,500), फरशी - 34 क्विंटल (6,000 ते 7,000),

Onion
Pune Water Supply: दक्षिण पुण्यात पाणीटंचाईला दिलासा; पाण्याच्या टाक्या कार्यान्वित

वालवड - 56 क्विंटल (3,500 ते 4,000), ढोबळी मिरची - 149 क्विंटल (3,000 ते 4,000), चवळी - 52 क्विंटल (2,000 ते 2,500), वाटाणा - 10 क्विंटल (9,000 ते 10,000), शेवगा - 50 क्विंटल (2,500 ते 3,000), गाजर - 150 क्विंटल (1,500 ते 2,000), गवार - 52 क्विंटल (3,000 ते 3,500), आले - 160 क्विंटल (4,000 ते 4,500), ओली भुईमूग शेंग - 60 पोती (4,500 ते 5,000).

Onion
Pune Accident: पुण्यात अल्पवयीन चालकाची थार 17 दुचाकींवर आदळली

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण 7 हजार 490 जुड्या (1,500 ते 2,500 रुपये). कोथिंबीर - एकूण 19 हजार 965 जुड्या (1,000 ते 2,500 रुपये). शेपू - एकूण 3 हजार 054 जुड्या (1,000 ते 1,400 रुपये). पालक - एकूण 3 हजार 651 जुड्या (600 ते 1,000 रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गायींपैकी 32 गायींची विक्री झाली (15,000 ते 70,000 रुपये), 55 बैलांपैकी 42 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), 80 म्हशींपैकी 67 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 11,100 शेळ्या-मेंढ्यापैकी 10,700 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news