Pune Sub Registrar Office Issue: पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची दुरवस्था; २७ पैकी १९ पदे रिक्त

अधिकाऱ्यांच्या अभावामुळे दस्तनोंदणी रखडली; स्टेशनरीअभावी नागरिकांना हेलपाटे
Pune Sub Registrar Office Issue
Pune Sub Registrar Office Issueझह्पोीग
Published on
Updated on

पुणे: राज्याला दरवर्षी सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागातील पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची दुरवस्था समोर आली आहे. शहरातील 27 पैकी तब्बल 19 दुय्यम निबंधकांची पदे रिक्त असल्याने कारभार सहाय्यक निबंधकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, तात्पुरत्या कार्यभारामुळे निर्णयप्रक्रियेत विलंब होत असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

Pune Sub Registrar Office Issue
Pune Open Drinking Public Areas: वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगरमध्ये ‘ओपन बार’; नागरिकांकडून कारवाईची मागणी

पुण्यात मोठ्या प्रमाणावर दस्तनोंदणी होत असताना संबंधित कार्यालयांत अधिकारी नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. आंबेगाव येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 हे अधिकारी अनुपस्थितीमुळे आठवडाभर बंद होते. त्यामुळे दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे. या शिवाय काही कार्यालयांत स्टेशनरीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Pune Sub Registrar Office Issue
Pune Blackmail Extortion Arrest: पुण्यात अत्याचार, ब्लॅकमेल व खंडणी प्रकरणी दाम्पत्य अटकेत

कोरे कागद व आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने नागरिकांनाच छायांकित प्रती व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हजारो रुपयांचे स्टॅम्प शुल्क भरूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिक व वकीलवर्गात नाराजी आहे.

Pune Sub Registrar Office Issue
Bombay High Court Child Custody Ruling: सहा वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांना नकार; आईकडेच राहणार संगोपन

टेंडर मंजुरीनंतर लागणार प्रश्न मार्गी

स्टेशनरी नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी तीन-चार कार्यालयांतून आल्या आहेत. कोरे कागद व अन्य स्टेशनरी खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयांना पाच हजार रुपयांपर्यंतची स्टेशनरी खरेदी करून बिले सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना पुन्हा काढण्यात येतील. लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल. टेंडर मंजूर झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल.https://youtu.be/eMY76JAqEuo?si=49artr4CaAmkK2sP

Pune Sub Registrar Office Issue
Pune Amedeya Company Stamp Duty Penalty: मुंढवा जमीन प्रकरण: अमेडिया कंपनीला 23 कोटींची मुद्रांक शुल्क व दंडाची नोटीस

पुणे शहरातील 27 पैकी 19 दुय्यम निबंधकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागांचा तात्पुरता कार्यभार अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, परीक्षांच्या कालावधीमुळे काही कर्मचारी सध्या रजेवर आहेत. आंबेगाव येथील हवेली क्रमांक 20 या कार्यालयात सहाय्यक निबंधकांकडे काम सोपविले होते; मात्र ते आजारी पडल्याने अनुपस्थित होते. त्यांच्या जागी सोमवारपासून (16 फेबुवारी) नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news