Pune Amedeya Company Stamp Duty Penalty: मुंढवा जमीन प्रकरण: अमेडिया कंपनीला 23 कोटींची मुद्रांक शुल्क व दंडाची नोटीस

दोन महिन्यांची मुदत संपली; कागदपत्रांसाठी 15 दिवसांची वाढ, 3 मार्चला पुढील सुनावणी
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

पुणे: मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेल्या दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपली आहे. त्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विभागाने आता 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून, पुढील सुनावणी 3 मार्च रोजी होणार आहे.

Land Scam
Pune Nilesh Ghaywal Absconding Case: पुण्यातील घायवळ बंधू अद्याप फरार; व्हिसा संपूनही नीलेशचा ठावठिकाणा अस्पष्ट

दरम्यान, अमेडिया कंपनीला थकीत मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपये आणि 2 कोटी 10 लाख रुपयांचा दंड, अशी एकूण 23 कोटी 10 लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतरही रक्कम न भरल्यास सक्तीची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Land Scam
Parth Pawar Baramati Project Visit: बारामतीतील कन्हेरी वनउद्यान व शिवसृष्टी प्रकल्पांची पार्थ पवारांकडून पाहणी

मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून सात टक्के मुद्रांक शुल्क म्हणजे 21 कोटी रुपये, तसेच 20 मे या दस्तनोंदणीच्या तारखेपासून आजपर्यंत दरमहा 1 टक्का दराने 1 कोटी 47 लाख रुपयांचा दंड, अशी एकूण 22 कोटी 47 लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले होते. ही रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 12 फेबुवारी रोजी संपली.

Land Scam
Pune Municipal Election Analysis: रविवार पेठ–नाना पेठ प्रभागात भाजप–राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागांवर

त्यानंतर कंपनीकडून नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती. ही सुनावणी सोमवारी (दि. 16) पार पडली. त्यात कंपनीच्या वकिलांनी बाजू मांडली.

Land Scam
Pune Municipal Election Analysis: मयूर कॉलनी–कोथरूड प्रभागात भाजपचा क्लीन स्वीप

या प्रकरणात कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, बिनवडे यांनी केवळ 15 दिवसांची मुदतवाढ दिली. त्यानुसार आता 3 मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार असून, त्यात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news