Pune Gas Shortage: पुण्यातील विद्यार्थी मेस आणि हॉटेल्सवर गॅस तुटवडा; जेवणासाठी गंभीर समस्या

स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थी जेवणासाठी संघर्ष करत, व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा 15 दिवस थांबला; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी
Pune Gas Shortage
Pune Gas ShortagePudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्यात शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हजारो विद्यार्थी वास्तव्याला आहेत. त्यांच्या नाष्टा, जेवण, चहाचा प्रश्न सोडविणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आणि मेसचालकांसमोर गॅसटंचाईची अभूतपूर्व समस्या निर्माण झाली असून, त्यांच्याकडे एक ते दोन दिवसांचे व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध आहेत, तर सिलिंडर मिळण्यासाठी आता किमान 15 दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, मेसचालक गॅसवर आहेत, तर विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींसमोर पोटाची खळगी भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune Gas Shortage
Pune Gas Shortage: पुण्यातील जुन्या हॉटेल्सवर गॅस तुटवडा; ग्राहकांसाठी चिंता वाढली

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठादारांनी पुढील पंधरा ते वीस दिवस सिलिंडर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आहे त्या गॅसवर एक ते दोन दिवसच हॉटेल किंवा मेस चालणार आहे.

Pune Gas Shortage
Pune Gas Shortage: पुण्यात केटरिंग व्यवसायावर गॅस तुटवडाचा परिणाम; लग्नसराईत संकटात

हॉटेल व्यावसायिक तसेच मेसचालकांकडून तात्पुरता पर्याय म्हणून इलेक्ट्रीक शेगड्यांचा वापर करून स्वयंपाक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर हॉटेल आणि मेस बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि स्पर्धा परीक्षार्थींमध्ये चिंता वाढली आहे. काही विद्यार्थ्यांनी तर जेवणाची व्यवस्था बंद झाल्यास गावी परतण्याचा विचार करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

परीक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात विद्यार्थ्यांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी आणि ही गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक मदत पुरवावी.

देवेंद्र अरुण ठाकरे, स्पर्धा परीक्षार्थी

Pune Gas Shortage
Maharashtra Land Records Department: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 994 नवीन पदांची भर, सेवा अधिक जलद होणार

इकडे आड, तिकडे विहीर...

मेसचालक तसेच हॉटेल व्यावसायिकांना केवळ व्यावसायिक ‌‘ वापरण्यास परवानगी आहे. सध्या पुरवठादारांकडून व्यावसायिक सिलेंडर देणे बंद आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरचा वापर मेसचालक तसेच हॉटेल व्यावसायिक करत आहेत का याची पाहणी पथकाकडून करण्यात येत आहे. वापर होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मेसचालक तसेच हॉटेल व्यावसायिकांना घरगुती गॅस सिलिंडर वापरता येत नाही. परिणामी त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

गॅसपुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अनेक खानावळी, हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. तसेच एक डब्बा दोन विद्यार्थ्यांना खाण्याची वेळ आली आहे. सरकारने सार्वजनिक पोळी भाजी केंद्र सुरू करून गरजू विद्यार्थ्यांची सोय करणे गरजेचे आहे. सरकारने शैक्षणिक संस्था आणि खानावळींसाठी तातडीने गॅस कोटा आरक्षित करावा. ही परिस्थिती अशीच राहिली, तर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

नितीन आंधळे, विद्यार्थी प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षार्थी

सध्या व्यावसायिक गॅसच्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे पुण्यातील मेसचालकांना गॅस मिळणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर मेसच्या दरांमध्ये प्रचंड वाढ होऊन विद्यार्थ्यांना पुण्यात राहणे आर्थिकदृष्ट्‌‍या अशक्य होईल. लॉकडाऊनसारखी भीषण परिस्थिती ओढवून विद्यार्थ्यांना पुन्हा गावी परतावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

तेज जहागीरदार, स्पर्धा परीक्षार्थी

Pune Gas Shortage
Pune Cricket Association: पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेवर भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचे आरोप

आम्हाला साधारण दोन दिवसांसाठी दोन टाक्या लागतात. पुरवठादारांनी गॅसची टाकी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. . सध्या 1700 रुपयांची टाकी सहा हजार रुपयांना विकत घेतली आहे. परंतु आता ती देखील मिळणार नाही. त्यामुळे चूल पेटवून केवळ राईसप्लेट ग््रााहकांना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. -

संतोष यादव, मालक, हॉटेल गणराज

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दुपारचे जेवण करण्यासाठी आमच्याकडे येतात. पण, एक दिवस पुरेलइतकाच गॅस उपलब्ध आहे. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न उभा राहिला आहे. गॅस उपलब्ध झाला नाही तर हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.

स्वाती वाघवले, हॉटेल व्यावसायिक

चहा तसेच नाष्टा करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थींची गर्दी असते. परंतु आता व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला असून, ब्लॅकने देखील सिलिंडर मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. 21 मार्चनंतर सिलिंडर मिळेल, असे सांगण्यात आले आहे. परंतु तोपर्यंत हॉटेल बंद ठेवायचे का, असा प्रश्न आहे.

शिवम जाधव, मालक, गणेश टी ॲण्ड स्नॅक्स सेंटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news