Pune Street Dogs: पुणेकरांना काहीसा दिलासा; शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या घटली

पर्यावरण अहवालात महापालिकेचा दावा
Pune Street Dogs
पुणेकरांना काहीसा दिलासा; शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या घटलीPudhari File Photo
Published on
Updated on

Stray dog population in Pune

पुणे: शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा जन्मदर 2018 नंतर 42.87 टक्क्यांनी घटल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही बाब नमूद केली आहे. शहरात 85 हजार 133 भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आले आहे.

शहरात, विशेषत: उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे समूह नागरिकांचा पाठलाग करतात. अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दिवसाही अनेक रस्त्यांवर भटक्या श्वानांचे साम्राज्य पाहायला मिळते. सध्या शहरात दोन ते अडीच लाख भटके श्वान आहेत. (Latest Pune News)


Pune Street Dogs
Pune Pollutuion: पुण्यावर प्रदूषणाची दाट छाया; कार्बन हवेत सोडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले

त्या तुलनेत वर्षभरात केवळ 12 ते 15 हजार श्वानांची नसबंदी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून नसबंदीबाबत कागदी घोडे नाचवले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. यामध्ये कॅनाइन कंट्रोल अँड केअर ही संस्था बाणेर, मुंढवा आणि नायडू रुग्णालय परिसरात मोफत सेवा देत आहे. युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर ही संस्था होळकरवाडी व कात्रजमध्ये कार्यरत आहे.

याशिवाय, भटक्या मांजरींच्या नसबंदी व लसीकरणासाठी वडकीत युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन ही संस्था काम करत आहे. शहरात रेबीजमुक्तीसाठी प्रयत्न सुरू असून, भटक्या कुत्र्यांपैकी किमान 70 टक्के कुत्र्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.

Pune Street Dogs
Panshet Dam Rain Update: पानशेत-वरसगाव परिसरात पावसाचा जोर ओसरला; धरणसाखळीत 88.76 टक्के पाणीसाठा

यासाठी युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीची नियुक्ती केली आहे. याशिवाय, खराडीत डॉग पार्क तयार करण्यासाठी मनपाने जागा मंजूर केली आहे. तसेच, आंबेगाव व भूगावमध्ये जखमी कुत्र्यांच्या उपचारासाठी डॉग पॉन्ड उभारण्याचे नियोजन आहे. पाळीव प्राण्यांचे परवाने व मांस विक्रीसाठी नवीन परवाने देण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे.

अहवालात नेमकं म्हटलंय काय?

सन 2018 च्या गणनेनंतर अहवालानुसार 85,133 भटक्या कुत्र्यांबर नसबंदी शस्त्रक्रिया, रेबीज लसीकरण आरोग्य विभागाच्या पशु वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. योग्य नियोजनामुळे शहर हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा जन्मदर 2023 अखेर 42.87 टक्क्यांनी कमी झाला आहे.अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनेनुसार 2030 पर्यंत रेबीजमुक्त शहराची मोहीम हाती घेण्यात आली आहे. एकूण श्वानसंख्येच्या किमान 70 टक्के भटक्या कुत्र्यांचे अँटीरेबीज लसीकरण अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने नियुक्त संस्थेमार्फत प्राधान्याने नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

महापालिकेच्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण मोहिमेतून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित व रेबीजमुक्त पर्यावरण देण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

- डॉ. सारिका फुंदे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news