Electric Buses Diesel Savings: पुणे एसटी विभागात इलेक्ट्रिक वाहनांमुळे डिझेल बचत; 11 हजार लिटरची रोज बचत

पुणे एसटी विभागात 105 इलेक्ट्रिक वाहनांमुळे दररोज सुमारे 11 हजार लिटर डिझेलची बचत होत असून इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा
Electric ST Buses
Electric ST BusesPudhari
Published on
Updated on

पुणे: मे 2026 पासून पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनामध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आगार पातळीवर डिझेलबचतीसाठी उपाययोजना केलेल्या आहेत.

Electric ST Buses
Pune Footpath Encroachment Removal: पुण्यात फुटपाथ अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष पथक; 110 कोटींचा प्रकल्प सुरू

विभागात 105 इलेक्ट्रिक वाहने असून, दैनंदिन 46 हजार 232 किलोमीटर चलनात येतात. त्यामुळे जवळपास 10 हजार 981 लिटर डिझेलची दैनंदिन बचत होत आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पूर्णक्षमतेने करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभाग नियत्रंक अरुण सिया यांनी दिली आहे.

Electric ST Buses
Census Worker Assault: पुण्यात जनगणना कर्मचाऱ्याला मारहाण व विनयभंग; गुलटेकडीत धक्कादायक घटना

पुणे विभागातील आगारांना आगारपातळीवर उद्दिष्टे निश्चित करून देण्यात आलेली आहेत. प्रत्येक आगाराने मागील वर्षांच्या तुलनेत 1 किलोमीटर प्रति 10 लिटरमध्ये (केपीटीएल) वाढ करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या फेऱ्यांचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अरुण सिया यांनी दिली.

Electric ST Buses
NDA Passing Out Parade: एनडीए 150 वा दीक्षांत समारंभ; खडकवासला येथे 353 कॅडेटचे भव्य संचलन

प्रवाशांनाही मिळणार दिलासा

प्रदूषणमुक्त आणि आवाजाचा त्रास नसलेल्या या ई-बस प्रवाशांच्याही पसंतीस उतरत आहेत. आगामी काळात लांब पल्ल्याच्या मार्गांवरही टप्प्याटप्प्याने नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल करण्याचे नियोजन सुरू असून, यामुळे ग््राामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि गतिमान सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Electric ST Buses
Pune Class 11 Admission Cutoff: अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढली; पुण्यातील नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ 8 ते 14 गुणांनी वाढले

प्रदूषणमुक्तीसह कोट्यवधींचा आर्थिक भार हलका

एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने घेतलेला हा निर्णय फक्त इंधन बचतीपुरता मर्यादित नसून, यामुळे दरमहा लाखो रुपयांचा महसूल वाचणार आहे. वाढत्या इंधन दराचा ताण कमी करण्यासाठी ‌‘इलेक्ट्रिक बस‌’ हा उत्तम पर्याय ठरत आहे. दररोज 11 हजार लिटर डिझेल वाचल्याने वातावरणात होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news