Shantata Punekar Vachat Aahet: ३ डिसेंबरला पुणेकर पुन्हा वाचनात रमणार; ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे चौथे वर्ष

सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत वाचनाचा उत्सव; शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मेट्रो स्थानकांसह विविध ठिकाणी सहभागाची संधी
Shantata Punekar Vachat Aahet
Shantata Punekar Vachat AahetPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: वाचन संस्कृतीला चालना देणारा 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम यंदा ३ डिसेंबर आयोजित करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला आहे. या अंतर्गत सकाळी ११ ते १२ या वेळेत पुणे आणि पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकाकडून वाचनाचा आनंद घेतला जाणार आहे. शाळा, महाविद्यालयांपासून शासकीय कार्यालयांपर्यंत आणि सोसायट्यांपासून मेट्रो स्थानकापर्यंत अनेक ठिकाणी या उपक्रमात नागरिकांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Shantata Punekar Vachat Aahet
Pune Metro Car Shed: पुणे मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा होणार? खडकवासल्यातील २० हेक्टर जागेचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडे

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १२ ते २० डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. या उपक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, समर्थ युवा फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

Shantata Punekar Vachat Aahet
Maharashtra Property Registration Services: मालमत्ता नोंदणीच्या सेवा १५ वरून १०; नागरिकांची कागदपत्रांची कटकट आणि कार्यालयीन हेलपाटे कमी होणार

पांडे म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हाच नाही, तर राज्यभरात, देशभरात आणि परदेशातील नागरिक, वाचनप्रेमी या वाचन उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. उपक्रमात नागरिक, वाचनप्रेमी सहभागी होऊ शकणार आहेत.

Shantata Punekar Vachat Aahet
Pune Water Scarcity Relief: पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाला गती; जिल्हाधिकाऱ्यांना ४० लाखांपर्यंत मंजुरीचे अधिकार

शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय, धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, शासकीय आणि खासगी विद्यापीठे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मेट्रो अशा सर्वच ठिकाणी सकाळी ११ ते १२ या वेळेत पुस्तक वाचनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Shantata Punekar Vachat Aahet
Bio Facade Building Cooling: पुण्यातील विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग; शैवाल-मॉसच्या जैविक आवरणातून इमारती नैसर्गिकरीत्या थंड ठेवणार

या उपक्रमात आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचता येणार आहे. वाचन करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करून सहभागाची नोंद करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती फर्ग्युसन महाविद्यालयातील पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयातून मिळेल, असे पांडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.