

पुणे : पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एका महिलेला बेदम मारहाण करुन तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ फेकल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली.
याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवणे भागात फिर्यादी महिलेला आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या एका महिलेने अडवले. तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तिला धक्का दिल्याने ती रस्त्यावर पडली. आरोपीने महिलेने रस्त्यात पडलेला दगड उचलून महिलेच्या चेहऱ्यावर मारला. त्यानंतर महिलेने बाटलीतून ॲसिडसदृश द्रवपदार्थ महिलेच्या चेहऱ्यावर ओतला. द्रवपदार्थ ओतल्याने महिलेचा चेहरा लालसर झाला. पोलीस उपनिरीक्षक लढी तपास करत आहेत.