

Pakistan Change Constitution After Operation Sindhur: भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांनी पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानला आपल्या सैन्य आणि संविधानिक व्यवस्थेतच बदल करावा लागला. त्यांनी हे नाईलाजास्तव केलं आहे. चौहान यांनी पाकिस्तानने नुकतेच केलेले संविधानातील संशोधन हे ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला किती मोठं नुकसान झालं आहे याचा पुरावा आहे.
सीडीएस अनिल चौहान यांनी सध्याच्या घडीला ऑपरेशन सिंदूर पॉज आहे. मात्र या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचे कच्चे दुवे आणि लष्करी दुबळेपणा उघड केला आहे. पाकिस्तानने आपल्या संविधानातील अनुच्छेद २४३ मध्ये बदल करत जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी चेअरमन हे पद संपुष्टात आणलं. या पदाद्वारे तीनही सैन्य दलात योग्य समन्वय साधला जात होता. आता पाकिस्तानने याच्या जागी चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस असं नवं पद निर्माण केलं आहे.
अनिल चौहान यांनी चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसची निर्मिती ही फक्त सेना प्रमुखांच्या शिफारसीनंतर होणार यावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शक्तीचे केंद्रीकरण होणार असल्याचे त्यांचे मत आहे.
आता पाकिस्तानच्या सेना प्रमुखाकडे फक्त भूदलाची नाही तर वायू आणि नौदलाची देखील जबाबदारी येणार आहे. तसेच अण्विक आणि रणनैतिक गोष्टींची देखील जबाबदारी असणार आहे. हे सत्तेचे केंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.
अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला देखील सुरक्षेच्या बाबतीत काही महत्वपूर्ण धडे मिळाले आहेत. भारत उरी सर्जिकल स्ट्राईक, डोकलाम, गलवान, बालाकोट एअर स्ट्राईक सारख्या मोहिमांचा अनुभवाच्या आधारे एक स्टँडर्डाईज संयुक्त थिएटर कमांड सिस्टमच्या दिशेने पुढे जात आहे. ही व्यवस्था २०२६ च्या मे महिन्यापर्यंत पूर्णपणे लागू करण्याचे ध्येय आहे. मात्र भारतीय सशस्त्र दल ही प्रणाली वेळेआधी लागू करण्याच्या दृष्टीकोणातून सक्रीय झाली आहे.