NDA Passing Out Parade 2026: एनडीए परेडमध्ये दिसणार ‘सारंग’चा थरार! आकाशात रंगणार हवाई कसरतींचा नेत्रदीपक शो

150व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात फॉर्मेशन फ्लाइंग, हवाई अचूकता आणि आत्मनिर्भर ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरची ताकद दिसणार; महिला कॅडेट्सचा ऐतिहासिक सहभाग
Sarang helicopter
Sarang helicopterPudhari
Published on
Updated on

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए ) ऐतिहासिक १५० व्या तुकडीच्या 'दीक्षांत संचलन' ( पासिंग आऊट परेड ) सोहळ्याचा एक भाग म्हणून, 'सारंग' हेलिकॉप्टरचे चित्तथरारक प्रदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम 29मे रोजी होणार असल्याने सारंग च्या प्रत्यक्षिकाचा सराव सुरु आहे.

Sarang helicopter
Pune Face Recognition Attendance: “आता हजेरी नाही, थेट AI मॉनिटरिंग!” पुणे महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांवर डिजिटल नजर

यंदा एनडीए मधून पदवी प्राप्त करणाऱ्या महिला कॅडेट्सची तिसरी तुकडी सहभागी होत आहे. ज्यामुळे सशस्त्र दलांमध्ये लिंग-समावेशकतेच्या (जेन्डर इंटिग्रेशन ) प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. लष्करी परंपरा आणि उत्कृष्टतेच्या या पार्श्वभूमीवर, 'सारंग' पथक आपल्या आकर्षक रंगांनी सजलेल्या हेलिकॉप्टर्ससह चित्तथरारक 'फॉर्मेशन फ्लाइंग', हवाई अचूकता आणि कसबपूर्ण हवाई कसरतींचे प्रदर्शन करेल.

Sarang helicopter
Pune Municipal Cleaning Contract Limit: “मक्तेदारी संपणार!” पुणे महापालिकेत ठेकेदारांना फक्त 2 कंत्राटांची मर्यादा

भारतीय वायुदलाचे अग्रणी दूत ('ब्रँड ॲम्बेसेडर्स ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सारंग' पथकाने भारतासह विदेशांत दिलेल्या नेत्रदीपक प्रदर्शनांच्या समृद्ध वारशाच्या जोरावर मोठी लोकप्रियता आणि गौरव प्राप्त केला आहे. या पथकाने २००४ मध्ये सिंगापूर येथे आयोजित 'एशियन एरोस्पेस शो'मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तेव्हापासून, त्यांनी जगभरातील ३९० हून अधिक ठिकाणी १,२०० हून अधिक हवाई प्रदर्शने सादर केली आहेत.

Sarang helicopter
Maharashtra Mental Health Institute: येरवडा, ठाणे, नागपूर मनोरुग्णालयांना मिळणार नवी ओळख! अध्यापन संस्था सुरू करण्याचा शासनाचा निर्णय

'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' या भारतीय कपंनीने (एचएएल ) द्वारे स्वदेशी बनावटीचे विकसित केलेले 'ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर' (एएलएच ) 'ध्रुव' चालवते. सर्व प्रकारच्या हवामानात आणि विविध मोहिमांसाठी सक्षम असलेले हे 'एएलएच ध्रुव' हेलिकॉप्टर, भारताची वाढती हवाई-अंतराळ क्षमता दर्शवते आणि 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेचे मूर्तिमंत प्रतीक ठरते.

Sarang helicopter
Maharashtra Midday Meal Scheme Inquiry: “मध्यान्ह भोजनात बदलाचा घोटाळा?” वाटाणा प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त

'सारंग' पथक 'एएलएच-एमके 1' या अत्यंत चपळ आणि कुशलतेने हाताळता येणाऱ्या प्रकाराचे उड्डाण करते. हे पथक २९ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजल्यापासून, एनडीए खडकवाला येथील प्रतिष्ठित 'सुदान ब्लॉक' आणि 'सलारिया चौक' या परिसरावर आपले हवाई प्रदर्शन सादर करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news