Pune RTO School Bus Safety: पुण्यात स्कूल बस-व्हॅन तपासणी मोहीम सुरू; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओची कडक कारवाई

फिटनेस प्रमाणपत्र, कागदपत्रे आणि नियमभंग तपासणीसाठी विशेष मोहीम; रविवारीही आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय
School Bus
School BusPudhari
Published on
Updated on

पुणे: वर्ष २०२६ सुरू झाले असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंबर कसली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्कूल बस आणि स्कूल व्हॅन वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिले आहेत.

School Bus
Pune Police Attack Case: बाणेर पोलिसांवर घरफोडी आरोपीचा चाकू हल्ला; स्वसंरक्षणार्थ गोळीबारात सराईत जखमी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसची सर्व कागदपत्रे वैध असणे आवश्यक असून, दोषी वाहनांवर थेट मोटार वाहन अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

School Bus
Pune Vegetable Prices: पाण्याच्या टंचाईचा फळभाज्यांवर परिणाम; पुण्यात आले, काकडी, फ्लॉवरसह अनेक भाज्या महागल्या

स्कूल बसचालकांसाठी रविवारीही आरटीओ कार्यालय सुरू

आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक स्कूल बस आणि व्हॅन चालकांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकीट) नूतनीकरण करण्याचे काम बाकी आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांची वाहतूक खंडित होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयामार्फत दर रविवारी देखील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. स्कूल बस चालक आणि मालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या वाहनांची कागदपत्रे तातडीने वैध करून घ्यावीत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

School Bus
Pune Sugar Prices: साखरेच्या दरात पुन्हा तेजी; पुण्यात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ

रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आता धडक कारवाई

केवळ कागदपत्रांची पूर्तता नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नियम भंग करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या तपासणीसाठी आरटीओने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणाऱ्या वाहनांवर थेट जागेवरच धडक कारवाई केली जाणार आहे. आरटीओच्या सर्व रस्ता सुरक्षा पथकांना यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.

School Bus
Pune Fruit Market Prices: चिक्कूची आवक घटल्याने भाव वधारले; पुणे फळबाजारात कलिंगड-खरबूजही महागले

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळा सुरू झाल्यामुळे परिवहन नियमांचे पालन करणे सर्व शालेय वाहन चालकांसाठी बंधनकारक आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी आम्ही रविवारीही आरटीओ कार्यालय सुरू ठेवून फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणाची संधी दिली आहे. मात्र, यानंतरही जे चालक किंवा मालक रस्त्यावर नियम भंग करताना आढळतील, अशा स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवर मोटार वाहन कायद्यानुसार अत्यंत कडक आणि धडक कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.

स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news