Pune Vegetable Prices: पाण्याच्या टंचाईचा फळभाज्यांवर परिणाम; पुण्यात आले, काकडी, फ्लॉवरसह अनेक भाज्या महागल्या

मॉन्सून उशिराने सक्रिय झाल्याने उत्पादन घटले; मार्केट यार्डात फळभाज्यांच्या आवकेत घट, दरात १० ते २० टक्क्यांची वाढ
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: मॉन्सून अद्याप सक्रिय न झाल्याने पुणे विभागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादन आणि दर्जावर झाला असून, उत्पादन घटल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत असल्याने आले, काकडी, फ्लॉवर, सिमला मिरची, शेवगा, मटार आणि पावटा यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Vegetable
Pune Sugar Prices: साखरेच्या दरात पुन्हा तेजी; पुण्यात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ

रविवारी (दि. २१) राज्यातील विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत एका ट्रकने कमी होती. मात्र मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे आले, काकडी, फ्लॉवर, सिमला मिरची, शेवगा, मटार आणि पावटा वगळता इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

Vegetable
Pune Fruit Market Prices: चिक्कूची आवक घटल्याने भाव वधारले; पुणे फळबाजारात कलिंगड-खरबूजही महागले

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४, कर्नाटक येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून १ टेम्पो भुईमुग शेंग, इंदौर येथून गाजर ११ ते १२ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदौर, आग्रा, आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ४० टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Chakan Market Onion Prices: चाकण बाजारात कांद्याच्या दरात वाढ; आले, वाटाणा, काकडी व शेवग्याचे भाव घसरले

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेटस, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, कोबी ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमुग शेंग १०० गोणी, कांदा सुमारे १०० टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Fish Prices: मासळीची आवक निम्म्यावर; पुण्यात माशांचे दर दुप्पट, चिकनही महागले

कोथिंबिर, मेथी, मुळा, कांदापात, अंबाडीची दरवाढ

मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी होत असल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. सर्वाधिक कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे १० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात कोथिंबिरीला दर्जानुसार १५ ते २५ रुपये भाव मिळत आहे. मेथी आणि मुळ्याच्या भावात प्रत्येकी ५ रुपयांनी वाढ झाली आहे. मेथीची आवक ४० हजारांवरून ३० हजार जुड्यांवर आली असून, तिचा भावही १५ ते २५ रुपये प्रति जुडी आहे. कांदापात आणि अंबाडीच्या भावात प्रत्येकी २ रुपयांची वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर पालेभाज्यांचे भाव मात्र स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीची ९० हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याइतकीच असली, तरी नेहमीच्या तुलनेत कमी असल्याने भाव तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news