Pune Road Digging Issue: पुण्यात 68 हजार मीटर रस्ते खोदले; दुरुस्तीच्या जबाबदारीवरून पालिकेतच गोंधळ

पावसाळ्यापूर्वी रस्ते बुजवण्याचे काम रखडले; पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जबाबदारीचा वाद चव्हाट्यावर
Development Work
Development WorkPudhari
Published on
Updated on

पुणे: स्मार्ट सिटीचा आव आणणाऱ्या महापालिकेचा ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विविध सेवा वाहिन्यांसाठी शहरात तब्बल 68 हजार 674 मीटर लांबीचे रस्ते खोडून अक्षरशः चाळण करून ठेवण्यात आले आहेत. ऐन पावसाळा तोंडावर आलेला असताना हे खोदलेले रस्ते नेमके बुजवायचे कोणी? ‌‘पथ विभागाने की क्षेत्रीय कार्यालयांनी?‌’ या अधिकारवाटपाच्या गोंधळात रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. या गोंधळामुळे पुणेकरांना यंदा पावसाळ्यात जीवघेण्या खड्ड्‌‍यांतून मार्ग काढावा लागणार आहे.

Development Work
Pune Theatre Rehearsal Spaces: पुण्यात कलाकारांसमोर तालमींचे संकट; परवडणाऱ्या सराव जागांची मागणी

महापालिकेने इंटरनेट, गॅस, वीज, सांडपाणी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी विविध सरकारी व खासगी कंपन्यांना रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे. यासाठी प्रतिमीटर 12 हजार 192 रुपये दराने तब्बल 50 कोटी 89 लाख 51 हजार 144 रुपयांचे ‌‘पुनर्स्थापना शुल्क‌’ (रिस्टेटमेंट चार्जेस) वसूल करण्यात आले.

Development Work
Pune Mephentermine Injection Racket: नशेसाठी इंजेक्शन विकणारा सराईत जेरबंद; पुण्यातून ८३ बॉटल जप्त

एवढा मोठा निधी तिजोरीत जमा झालेला असताना आणि पोलिसांच्या सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नसताना, प्रशासन मात्र सुस्त पडले आहे. 31 मेपर्यंत संपूर्ण रस्त्यांची दुरुस्ती करून खोदाई बंद करण्याची मुदत असताना आजही अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरूच आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते.

Development Work
Pune Food Streets 10 PM Rule: पुण्यातील सर्व खाऊगल्ल्या रात्री १० वाजता बंद; पोलिसांचा कडक आदेश

यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला साडेतीन कोटींचा निधी देण्यात आला, तर सिंहगड रस्ता, औंध-बाणेर, धनकवडी, कोथरूड आणि नगर रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांना समाविष्ट गावांसाठी अतिरिक्त 4.70 कोटी रुपयांसह एकूण 58.70 लाख रुपये वेगळे देण्यात आले. मे महिना संपत आला, तरी या निधीचा वापर करून रस्ते दुरुस्त करण्यात क्षेत्रीय कार्यालयांना अपयश आले आहे.

Development Work
Pune Gang War Jail Control: पुण्यातील टोळीयुद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ जेलमधून? आंदेकर टोळीवर कडक निर्बंधांची तयारी

अतिरिक्त आयुक्तविरुद्ध पथ विभाग प्रमुख!

रस्ते दुरुस्तीच्या कामावरून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच तीव मतभेद असल्याचे समोर आले आहे. ‌‘आम्ही क्षेत्रीय कार्यालयांना निधी दिला असून, खड्डे बुजवणे त्यांचे काम आहे, आम्ही केवळ मोठ्या प्रकल्पांची कामे करतो,‌’ असे पथ विभाग प्रमुख राजेश बनकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे, ‌‘क्षेत्रीय कार्यालयांच्या कामाचा दर्जा सुमार असल्याने हे काम पुन्हा पथ विभागाकडे सोपवले असून, दोन दिवसांत काम सुरू होईल,‌’ असा दावा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या विसंगत विधानांमुळे पालिकेतील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news