Pune Gang War Jail Control: पुण्यातील टोळीयुद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ जेलमधून? आंदेकर टोळीवर कडक निर्बंधांची तयारी

कारागृहातूनच टोळीच्या हालचाली नियंत्रित होत असल्याचा संशय; पोलिसांकडून व्हिडिओ कॉन्फरन्स हजेरीसह कठोर उपाययोजनांची मागणी
Yerwada Jail
Yerwada Jail Pudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा ‌‘रिमोट कंट्रोल‌’ कारागृहातूनच चालत असल्याचा संशय गडद झाल्यानंतर आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात कडक निर्बंध व लॉकडाऊन आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्याच्या कारागृह प्रशासनाला पत्रव्यवहार केला असून, टोळीतील प्रमुख आरोपींना वेगळे ठेवणे, नातेवाईक भेटींवर निर्बंध आणणे, कारागृहातून फोन करण्यास मज्जाव करणे आणि न्यायालयीन तारखांना प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Yerwada Jail
Katraj Dairy President Resignation: कात्रज डेअरीत राजीनामा नाट्य; अखेर अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांचा पदत्याग

दैनिक ‌‘पुढारी‌’ने दि. 21 रोजी ‌‘रंजित खेळाचा रिमोट कंट्रोल कारागृहात‌’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून कारागृहातूनच टोळीयुद्धाचे सूत्र हलत असल्याचे उघड केले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर सुरू झालेल्या संघर्षात आयुष कोमकरचा खून, गणेश काळेचा खून आणि अन् दि. 20 मे रोजी अक्षय मस्केवरील जीवघेणा हल्ला या घटनांमुळे टोळीचे म्होरके जेलमध्ये असले, तरी बाहेर रक्तपात सुरूच असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये आंदेकर टोळी कारागृहात असूनही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे तपासातून समोर आले आहे.

Yerwada Jail
Pune Vistadome Coach: व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणे विभागाला 6.93 कोटींचा महसूल

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाशी समन्वय सुरू केला आहे. आंदेकर टोळी आणि प्रतिस्पर्धी टोळ्यांतील आरोपी कारागृहातूनच बाहेरील साथीदारांना सूचना देत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेषतः भेटी, मोबाईल संपर्क आणि न्यायालयीन तारखांदरम्यान संदेशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे समजते.

Yerwada Jail
Pune Nature Photography Exhibition: पुण्यात ‘प्रतिबिंब’ छायाचित्र प्रदर्शन सुरू; निसर्गाचे मनमोहक क्षण रसिकांसाठी खुले

यामुळे आता टोळीतील प्रमुख आरोपींना एकत्र न ठेवता वेगवेगळ्या बराकीत हलविणे, त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे आणि फोन सुविधेवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जात आहे. तसेच, न्यायालयीन तारखांना आरोपींना प्रत्यक्ष नेण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरात सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कारागृहातून चालणाऱ्या या कथित ‌‘रिमोट कंट्रोल‌’वर पोलिस आणि कारागृह प्रशासन कितपत लगाम लावते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Yerwada Jail
Pune Gavran Mango: गावरान आंब्याला हवामानाचा फटका; उत्पादन 30% घट, दरात वाढ

आंदेकर टोळी, सोमनाथ गायकवाड टोळी कारागृहात असताना नेमकं काय घडलं?

  • माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर पुण्यात टोळीयुद्ध तीव झाले

  • आयुष कोमकरचा निर्घृण खून करण्यात आला

  • कोंढव्यात गणेश काळेवर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या

  • अक्षय मस्केवर जीवघेणा हल्ला; थोडक्यात बचावला, आंदेकर आणि गायकवाड टोळीतील मुख्य आरोपी कारागृहात असतानाही बाहेर रक्तपात सुरू

  • कारागृहातूनच टोळीच्या हालचाली नियंत्रित होत असल्याचे तपासातून समोर आले

  • भेटी, मोबाईल संपर्क आणि कोर्ट तारखांमधून संदेश पोहोचत असल्याची सूत्रांची माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news