Pune Road Cleaning: पुण्यात ठेकेदारांच्या झाडणकामाचा बोजवारा; चार कंपन्यांना नोटिसा, एकाला दंड

रस्त्यांवर कचरा, धूळ अन् गाळ कायम; ‘परफॉर्मन्स बेस्ड’ सफाईवर महापालिकेची कडक कारवाई
Road Cleaning
Road CleaningPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवूनही प्रत्यक्षात कचरा, धूळ, गाळ आणि 'क्रॉनिक स्पॉट' कायम असल्याचे महापालिकेच्या पाहणीत उघड झाले आहे. 'परफॉर्मन्स बेस्ड' झाडणकामाच्या नावाखाली कामात हलगर्जीपणा होत असल्याने महापालिकेने चार ठेकेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून, प्रियांक इंटरप्रायझेसला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Road Cleaning
Bhimashankar Temple: भीमाशंकरात शेवटच्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांची गर्दी; प्लास्टिकबंदीचा बट्ट्याबोळ

अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी

महापालिकेने शहरातील झाडणकाम अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर 'परफॉर्मन्स बेस्ड' झाडणकाम प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, काम सुरू होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरी अनेक भागांमध्ये अपेक्षित स्वच्छता होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळले. येरवडा, वडगावशेरी आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काम करणाऱ्या प्रियांक इंटरप्रायझेसच्या कामाची सोमवारी पाहणी करण्यात आली.

Road Cleaning
Shirur Milk Adulteration Case: दूध भेसळप्रकरणी २६ जणांवर गुन्हा; शिरूरमधील आरोपींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह

विमानतळ रस्ता, हॉटमिक्स प्रकल्प परिसर, वडगावशेरी, शिवाजी महाराज उद्यान परिसर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब चौक या पाच ठिकाणी झाडणकाम झाले नसल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र कचरा आणि क्रॉनिक स्पॉट आढळले. सफाई सेवकही हद्दीत उपस्थित नव्हते. त्यामुळे नियमानुसार पाच बीट्सचे झाडणकाम न केल्याबद्दल पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Road Cleaning
Ujani Dam Fishing Contract: उजनीतील मासेमारीचा ठेका रद्द करा; ४५ गावांतील मच्छीमारांचा एल्गार

सुमित फॅसिलिटीज लिमिटेडकडे असलेल्या हडपसर-मांजरी परिसरातील गाडीतळ भागातही झाडणकाम असमाधानकारक आढळले. दि. १ सप्टेंबरच्या पाहणीनंतर कंपनीला कामकाज सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, सिद्धिविनायक इंटरप्रायझेसच्या नऱ्हे , नांदोशी-सणसनगर, धायरी व नांदेड फाटा परिसरातील कामाची पाहणी केली असता, रस्त्यांचे झाडणकाम न झाल्याचे, कचरा व क्रॉनिक स्पॉट, तसेच रस्त्यांच्या कडेला गवत वाढल्याचे आढळले.

Road Cleaning
Pune MPSC Paper Leak Protest: एमपीएससी पेपरफुटीविरोधात पुण्यात हजारोंचा एल्गार; तीन दिवसांचा अल्टिमेटम

दरम्यान, ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेलच्या सातारा रस्त्यावरील यांत्रिक झाडणकामावरही गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, प्लास्टिक, गाळ व धूळ साचलेली आढळली. 'कर्ब-टू-कर्ब' सफाई न झाल्याने धुळीचे प्रमाण वाढत असल्याचेही निदर्शनास आले. यापूर्वी नोटीस देऊनही सुधारणा न झाल्याने कंपनीला २४ तासांत खुलासा मागविण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा न दिल्यास दंड, सुरक्षा अनामत जप्ती, करार रद्द करणे, तसेच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news