Bhimashankar Temple: भीमाशंकरात शेवटच्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांची गर्दी; प्लास्टिकबंदीचा बट्ट्याबोळ

श्रावणसरी, धुके अन् निसर्गसौंदर्याचा भाविकांनी घेतला आनंद; प्लास्टिकबंदीला हरताळ, जंगल परिसरात कचरा
Bhimashankar Temple
Bhimashankar TemplePudhari
Published on
Updated on

भीमाशंकर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या चौथ्या श्रावणी सोमवारी अधूनमधून येणाऱ्या श्रावणसरी, ऊन व धुके यामध्ये सुमारे लाखो भाविकांनी 'जंगलवस्ती भीमाशंकर की जय', 'हर हर महादेव'च्या जयघोषात परिसर दुमदुमून सोडला. माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पवित्र शिवलिंगाला जलाभिषेक करून दर्शन घेतले. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने मागील तीन दिवस भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांचा ओघ जास्त होता.

Bhimashankar Temple
Shirur Milk Adulteration Case: दूध भेसळप्रकरणी २६ जणांवर गुन्हा; शिरूरमधील आरोपींच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, भीमाशंकरमधील पाऊस कमी झाला असून, अधूनमधून श्रावण सरी पडत आहेत. धुक्याने संपूर्ण परिसर वेढलेला आहे. शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्य व परराज्यांतून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यात्रेसाठी विविध एसटी आगारांमधून जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. वाहनतळ ते बसस्थानक अशी भाविकांची वाहतूक करण्यासाठी एसटी गाड्या व खासगी गाड्या येथे तैनात करण्यात आल्या होत्या.

Bhimashankar Temple
Ujani Dam Fishing Contract: उजनीतील मासेमारीचा ठेका रद्द करा; ४५ गावांतील मच्छीमारांचा एल्गार

यात हौशी भाविक, पर्यटक हे भीमाशंकर परिसरातील पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच हनुमानतळे, गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, धबधबे आदी ठिकाणी निसर्गसौंदर्य पाहण्याचा, भिजण्याचा व फिरण्याचा मनमुराद आनंद घेत होते. हळुवार येणाऱ्या वाऱ्यांच्या लहरींबरोबर येणारा पाऊस, धुक्यामुळे भाविक आणि पर्यटक रमून जात होते.

Bhimashankar Temple
Pune MPSC Paper Leak Protest: एमपीएससी पेपरफुटीविरोधात पुण्यात हजारोंचा एल्गार; तीन दिवसांचा अल्टिमेटम

भीमाशंकर यात्रा गर्दीचे नियोजन देवस्थान अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले, देवस्थानचे विश्वस्त यांनी केले. एसटीचे नियोजन मारुती खळदकर यांनी केले. महसूलचे मंडलाधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार वाहनतळांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर व पायऱ्या स्वच्छतेचे काम स्वकाम सेवा आळदी संघाच्या कर्मचाऱ्यांनी केले.

Bhimashankar Temple
Pune Ganeshotsav DJ Culture: पुण्याच्या गणेशोत्सवात ‘आवाजाची स्पर्धा’; पारंपरिक वादनावर डीजेचे वर्चस्व

प्लास्टिकबंदीचा बट्ट्याबोळ

या वर्षी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस ठाण्याचे महिला व पुरुष पोलिस पाटील चारही सोमवारी चोख बंदोबस्तात सहभागी झाले होते. भीमाशंकर येथे प्लास्टिकबंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी येथे येणारे भाविक, पर्यटक जंगल परिसरात रस्त्यालगत बाटली, कागद मोठ्या प्रमाणात टाकत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news