Pune Road Accident: पुण्यात दोन भीषण अपघात; ट्रक आणि डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्ता आणि उंड्री परिसरात दुर्घटना; टेम्पोचालकाचा उपचारापूर्वी मृत्यू, डंपरचालक अटकेत
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर रस्ता तसेच उंड्री परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात ट्रकवर आदळून टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Accident
100th Marathi Sahitya Sammelan: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी; देशभर होणार ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने

नल्लाबेल्ली नागेश्वरराव (वय ५०, रा. पुडी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याबाबत ट्रकचालक मोहम्मद हनीफ ख्वाजामियाँ शेख (वय ३८, रा. बार्शी, जि. सोलापूर) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Accident
Marathi Sahitya Sammelan Logo Competition: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह स्पर्धा; विजेत्याला मिळणार ५१ हजारांचे बक्षीस

शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे चारच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरून भरधाव टेम्पो निघाला होता. लोणी काळभोर भागातील कुंजीरवाडी परिसरात टेम्पो पाठीमागून ट्रकवर आदळला. ट्रकवर टेम्पो आदळल्यानंतर पाठीमागून येणारी जीप ट्रकवर आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नल्लाबेल्ली याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Accident
CET Admission Process: सीईटी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पसंतीक्रम भरताना दिसणार थेट कट-ऑफ

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करीत आहेत. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उंड्री परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत रूपेश दिलीप बनसोडे ( रा. वारजे माळवाडी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

Accident
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणाला राजकीय वळण; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांचा जल्लोष

याप्रकरणी डंपरचालक साईराज संभाजी शितोळे (वय २५, रा. भूमकर चौक, वाकड) याला अटक केली. बनसोडे याचा भाऊ योगेश दिलीप बनसोडे (वय ३३) याने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news