Pune accident compensation: अपघातात 78% अपंगत्व; दुचाकीस्वाराला एक कोटी रुपयांची भरपाई

मध्यस्थीद्वारे न्यायालयीन वाद निकाली; विमा कंपनीशी कोर्टाबाहेर समेट
Pune accident compensation
दुचाकीस्वाराला एक कोटी रुपयांची भरपाईPudhari
Published on
Updated on

पुणे : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण आणि विमा कंपनीत झालेल्या मध्यस्थीदरम्यान तरुणाला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. 2022 मध्ये घडलेल्या अपघातानंतर जखमी झालेल्या दुचाकी चालकास दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले, तसेच 78 टक्के अपंगत्व आले. त्यामुळे न्यायालयीन वाद न वाढविता हा वाद मध्यस्थीच्या मार्गाने निकाली निघाला.(Latest Pune News)

Pune accident compensation
Bhima River Water Level: भीमा नदीची पाणी पातळी पूर्वपदावर; उजनी धरणातून 6600 क्युसेक विसर्ग

या प्रकरणात संदीप महाजन यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. सात फेबुवारी 2022 रोजी ते पत्नीसमवेत स्कूटरवरून जात होते. या वेळी, त्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघातात महाजन यांना गंभीर दुखापत झाली.

Pune accident compensation
Pune municipal ward delimitation 2025: पुणे प्रभागरचनेत भाजपचा वरचष्मा कायम; राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का

अपघातानंतरच्या उपचारांसाठी महाजन यांना तब्बल 16 लाख रुपये खर्च झाले. ते एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांना दरमहा 60 हजार रुपयांचा पगार होता. त्यामुळे एक कोटी 20 लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्यासाठी महाजन यांनी विमा कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता.

Pune accident compensation
Vadgaon Sheri MLA attack: “माझ्यावर हल्ला पूर्वनियोजितच होता” – आ. बापूसाहेब पठारे यांचा आरोप

मात्र, प्रकरण प्रलंबित राहण्याऐवजी मध्यस्थीमार्फत तोडगा काढण्याचे ठरले. न्यायालयीन सुटीतही मध्यस्थी प्रक्रिया पार पडली. विमा कंपनीच्या वकिलांनी तसेच अर्जदाराच्या बाजूच्या वकिलांनी सक्रिय सहभाग घेतला. या समझोत्यामुळे न्यायालयीन खटला लांबला नाही, वेळ आणि खर्चाची मोठी बचत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news