Pune Illegal RMC Plant Controversy: पुण्यात आरएमसी प्रकल्पांवर कारवाई थांबली? नागरिकांचा संताप

वडगाव खुर्दमधील कारवाई रद्द झाल्याने महापालिकेवर राजकीय दबावाचा आरोप; प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Factory Pollution
Factory PollutionPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिका प्रशासनाचा ‌‘हातोडा‌’ केवळ सामान्यांसाठीच आहे की काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शहरातील आरएमसी प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना, बड्या राजकीय नेत्यांच्या दबावापुढे महापालिका आयुक्तांसह बांधकाम विभाग सपशेल नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे.

Factory Pollution
Pune Solid Waste Management Controversy: पुणे महापालिकेत घनकचरा विभागात मोठी फेररचना

लोहगाव-खांदवेनगरमधील कारवाईचा मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला वडगाव खुर्द येथील प्रकल्पांवर कारवाई करण्यासाठी ‌‘मुहूर्त‌’ सापडत नसल्याने पुणेकरांच्या जिवापेक्षा पुढाऱ्यांचे हित मोठे आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Factory Pollution
Baramati Bypoll EVM Security: बारामती पोटनिवडणुकीनंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित

नागरिकांच्या तक्रारीनंतर लोहगावात सात प्रकल्प जमीनदोस्त करून प्रशासनाने आपण ‌’सिंघम‌’ असल्याचे भासवले. मात्र, खरा कस वडगाव खुर्दमध्ये लागणार होता. नदीपात्रात आणि रहिवासी भागात असलेल्या या अनधिकृत प्रकल्पांवर पहाटे कारवाईचे नियोजन होते.

Factory Pollution
Purandar NH 965 Toll Protest: जेजुरीतील NH-965 टोलला विरोध; वारकरी व स्थानिक नागरिक संतप्त

मात्र, बांधकाम विभागातील एका ‌‘बिभीषणाने‌’ ही माहिती आधीच प्रकल्प मालकांना पोहोचवली. कारवाई होणाऱ्या प्रकल्पांमध्ये राजकीय हितसंबंध गुंतलेले असल्याने मंत्रालयापासून महापालिकेपर्यंत सूत्रे फिरली आणि पहाटेची ती कारवाई अचानक रद्द करण्यात आली.

Factory Pollution
Pune Child Aadhaar Update Deadline Issue: पुण्यात 5.5 लाखांहून अधिक मुलांचे आधार अद्ययावत नाही; प्रशासनाचा इशारा

राजकीय ‌‘मिक्सिंग‌’मध्ये पुणेकरांचे आरोग्य धुळीत!

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार ‌‘कारवाई पुन्हा सुरू होणार‌’ अशा पोकळ वल्गना केल्या. मात्र, पुढाऱ्यांच्या दबावापुढे प्रशासनाचा कणा मोडला आहे. रहिवासी क्षेत्रात धुळीचे लोट सोसणाऱ्या नागरिकांना दमा आणि श्वसनाचे आजार जडले आहेत; पण महापालिकेला केवळ लोहगावचेच प्रदूषण दिसले का? वडगाव खुर्द आणि शहरातील इतर भागांतील अनधिकृत प्रकल्प प्रशासनाच्या डोळ्यांवर राजकीय पट्टी बांधल्यामुळे दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news