Santosh Pandit Arrest: रात्री 1 वाजता पोलिसांची धाड! संतोष पंडितांना घरातून उचललं; अटकेचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

Pune Santosh Pandit Arrest: पुणे महापालिकेच्या विकासकामांवर सोशल मीडियातून टीका करणारे रिलस्टार संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या घरातून अटक केली.
Pune Santosh Pandit Arrest
Pune Santosh Pandit ArrestPudhari
Published on
Updated on

Pune Santosh Pandit Arrest: पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भाष्य करणारे रिलस्टार संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. बुधवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी संतोष पंडित आणि पोलिसांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणारे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध करत होते. कोथरूड परिसरातील विकासकामांवर भाष्य करताना त्यांनी आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

मध्यरात्री पोलिसांचे पथक घरी दाखल

रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान कोथरूड पोलिसांचे पथक दोन पांढऱ्या वाहनांमधून संतोष पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. पथकातील काही कर्मचारी साध्या वेशात होते. पोलिसांनी पंडित यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

पोलिसांकडून संतोष पंडित यांना वाहनात बसवले जात असताना त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपली भूमिका मांडली. रात्री उशिरा पोलिसांनी घरात येऊन आपल्याला अटक केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

"आमच्यासारख्यांची हीच लायकी आहे का?"

अटकेच्या वेळी संतोष पंडित यांनी, "रात्री साडेबारा-एक वाजता आमच्या घरात पोलीस घुसतात. आमच्यासारख्यांची हीच लायकी आहे," अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडून पोलिसांना काही त्रास झाला असेल किंवा तपासात सहकार्य केले नसेल, तर त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. त्याचबरोबर अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभारही मानल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मोबाईल, गाडीची किल्ली आणि बेल्ट कुटुंबीयांकडे

पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी संतोष पंडित यांनी पोलिसांना काही क्षण थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा मोबाईल फोन, गाडीची किल्ली आणि कमरेचा बेल्ट काढून कुटुंबीयांकडे दिला.

पोलिसांना कोणत्या वस्तूंची आवश्यकता नसते, याची आपल्याला माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अटकेच्या या संपूर्ण प्रसंगाचे चित्रीकरण त्यांच्या कुटुंबीयांनी केले असून, तो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Pune Santosh Pandit Arrest
Vidyanand Bapat: 'आमच्या भावना दुखावल्या', बापटांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार म्हणणारे धनंजय कुलकर्णी कोण? वाद पेटला

संतोष पंडितांविरोधात यापूर्वीही तक्रार

संतोष पंडित यांच्याविरोधात यापूर्वीही आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओच्या संदर्भात तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता.

या प्रकरणात मंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप करत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी ही तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Pune Santosh Pandit Arrest
Pune Pedestrian Flyovers: कोट्यवधींचे पादचारी पूल, वापर मात्र तासाला दोन-तीन जणांचा वापर! लिफ्ट बंद, पायऱ्या तुटल्या; महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

विकासकामांवरील टीकेपासून आक्षेपार्ह भाषेपर्यंत वाद

संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विकासकामांतील त्रुटी, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कामकाजावर सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांच्या व्हिडीओमधून दिसून येते. मात्र, काही व्हिडीओमध्ये टीका करताना अश्लील, शिवराळ किंवा असभ्य भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नेमकी कोणती कलमे लावण्यात आली आहेत आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news