Pune Rain
पुण्यात परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग; अर्ध्या तासात शहरात 18 मि. मी. पावसाची नोंदPudhari

Pune Rain: पुण्यात परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग; अर्ध्या तासात शहरात 18 मि. मी. पावसाची नोंद

सर्वच रस्त्यांना पूर आला आणि गारठा वाढला.
Published on

पुणे: मान्सून 15 सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत असून, तो जाताना जोरदार बरसत आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी झाली. शहरात सायंकाळी 6 ते 6.30 या अर्ध्या तासात पावसाने जोरदार बॅटिंग केली. सर्वच रस्त्यांना पूर आला आणि गारठा वाढला. रात्री 8 पर्यंत शिवाजीनगरात 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

शहरात 1 सप्टेंबरपासूनच पाऊस कमी झाला होता. फक्त गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी 78 सप्टेंबर रोजी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस पूर्ण कमी झाला होता. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच मान्सून यंदा लवकर परतीला निघण्यास सुरुवात झाली. (Latest Pune News)

Pune Rain
Devaram Lande: देवराम लांडे यांच्या मुलाच्या शोधार्थ पथके रवाना; सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोरे यांची माहिती

त्यामुळे शहरात शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला. दुपारी 4 नंतर आकाश काळ्या ढगांनी झाकोळून गेले आणि अतिमुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. रस्त्यांना पूर आला. शहरातील सर्व पेठा आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचले. तसेच हवेत गारवा निर्माण झाला.

तीन दिवस शहरात पावसाचा अंदाज

घाटमाथ्याला तीन दिवस ‌‘ऑरेंज अलर्ट‌’ दिला असून 12 ते 15 सप्टेंबरदरम्यान ‌‘अतिमुसळधारे‌’चा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातदेखील ‌‘मुसळधार ते अतिमुसळधारे‌’चा अंदाज आहे. दिवसभर कडकऊन अन सायंकाळी पाऊस असे वातावरण आगामी तीन ते चार दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Pune Rain
‌Haffkine Issues: ‘हाफकिन‌’च्या समस्या सोडवणार; अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन

शहरात सायंकाळी 8 पर्यंत झालेला पाऊस (मि.मी.)

  • शिवाजीनगर- 18

  • पाषाण- 3

  • लोहगाव- 2

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news