Pune Rain Waterlogging: पुण्यात पावसाळी नियोजनावर मुरलीधर मोहोळ संतप्त; पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर महापालिकेला धारेवर धरले

'85 ठिकाणी सुधारणा केली म्हणता, मग पाणी कुठे थांबले?' केंद्रीय राज्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल
Murlidhar Mohol
Murlidhar MoholFile Photo
Published on
Updated on

पुणे: शहरातील पावसाळी नियोजन आणि पाणी साठणाऱ्या ठिकाणांवरील उपाययोजनांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या प्रभावीपणे कमी का झाली नाही, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

Murlidhar Mohol
Alandi Wari 2026: आळंदीत पावसातही भक्तिरसाचा जल्लोष; हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या फुगड्यांनी रंगली वारी

शहरात मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यमंत्री मोहोळ यांनी महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेत आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळी कामांचा आढावा घेतला.

Murlidhar Mohol
Pune Flood Update: पुण्यात 24 तासांत 121 मिमी पाऊस; 1,100 हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या हद्दीत १२० पाणी साचणारी ठिकाणे असून, त्यांपैकी ८५ ठिकाणी सुधारणा केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी बैठकीत केला. मात्र, त्या ८५ ठिकाणांपैकी नेमक्या किती ठिकाणी यंदाच्या पावसात पाणी साचले नाही, याची कोणतीही ठोस माहिती अधिकाऱ्यांकडे नव्हती.

Murlidhar Mohol
Pune Heavy Rain Update: पुण्यात पावसाचा कहर कायम; चिंचवडमध्ये 268 मिमी पाऊस, घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट

यावर नाराजी व्यक्त करत पुढील बैठकीत सर्व ८५ ठिकाणांचे पावसाच्या काळातील छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना आम्हालाच उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे केवळ कागदोपत्री कामे दाखवून चालणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

Murlidhar Mohol
Pune Road Potholes: पुण्यात खड्ड्यांचा कहर; महापालिकेकडे डांबरच संपले, कोचीवरून मागविणार पुरवठा

भाजपच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. आता पावसाळी कामांवर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली असली तरी सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नाही का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच महापालिकेतील कारभाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news