Alandi Wari 2026: आळंदीत पावसातही भक्तिरसाचा जल्लोष; हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या फुगड्यांनी रंगली वारी

पूरपरिस्थितीमुळे गर्दी मर्यादित; तरीही इंद्रायणी तीरावर टाळ-मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरण
Alandi Wari 2026
Alandi Wari 2026Pudhari
Published on
Updated on

आळंदी:

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।नाचती वैष्णव भाईं रे ।

क्रोध अभिमान गेला पावटणी । 

एक एका लागतील पायीं रे ।।

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।

टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।

अनुपम्य सुखसोंहळा रे ।।

Alandi Wari 2026
Pune Flood Update: पुण्यात 24 तासांत 121 मिमी पाऊस; 1,100 हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ..माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने अन पुराणे भरून आलेला  इंद्रायणीचा काठ..माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा..अशा वातावरणाने अलंकापुरी दुमदुमून गेली.

Alandi Wari 2026
Pune Heavy Rain Update: पुण्यात पावसाचा कहर कायम; चिंचवडमध्ये 268 मिमी पाऊस, घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट

शहरातील इंद्रायणी नदीवरील पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने वारकऱ्यांना केलेले शहरात न येण्याचे आवाहन आणि आळंदी देवस्थानने केलेली मोजक्याच वारकरी,मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पाडण्याचे नियोजन यामुळे शहरातील रस्त्यावर अधिक गर्दी न होता तुरळक वारकऱ्यांची गर्दी दिसून येत होती; मात्र शहरात दाखल झालेल्या दिंड्यांनी उत्साहात पावसाच्या सरी झेलत हरिनाम गजरात फुगड्यांचे फेर धरल्याचे दिसून आले.

Alandi Wari 2026
Pune Road Potholes: पुण्यात खड्ड्यांचा कहर; महापालिकेकडे डांबरच संपले, कोचीवरून मागविणार पुरवठा

प्रदक्षिणा रस्त्यावरील दिंडीतील भाविकांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. शहरात प्रस्थान सोहळ्यानिमित्त उत्साह संचारला असून पालखी संध्याकाळी मंदिराबाहेर पडल्यानंतर त्यात अधिक भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news