Pune Heavy Rain Update: पुण्यात पावसाचा कहर कायम; चिंचवडमध्ये 268 मिमी पाऊस, घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट

सलग सहा दिवस मुसळधार पाऊस; झाडपडीच्या 212 घटना, बसमधील कर्मचारी आणि नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका
Heavy Rain
Heavy RainPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात दोन रात्री अतिमुसळधार पावसाने रौद्ररूप दाखवले. रविवारपाठोपाठ सोमवारी पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडवून दिली. सोमवारी रात्री १० ते मंगळवारी सकाळी ९.३० पर्यंत चिंचवड भागात सर्वाधिक २६८, लोहगाव १७४, शिवाजीनगर भागात ९७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुणेकरांना मंगळवारी पाच दिवसांनी सूर्यदर्शन झाले ते देखील काही क्षण. त्यानंतर पुन्हा ढगांनी सूर्य झाकून गेला अन्‌ पावसाला सुरुवात झाली.

Heavy Rain
Pune Road Potholes: पुण्यात खड्ड्यांचा कहर; महापालिकेकडे डांबरच संपले, कोचीवरून मागविणार पुरवठा

शहरात सलग पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारच्या पावसाने अग्निशमन दलाची प्रचंड धावपळ केली. त्यांना गेले ४८ ते ७२ तास सतत झाडपडीसह लोकांना पुराच्या पाण्यातून सावरण्याचे काम केले. अनेक घरांत वसाहतीत पाणी गेल्याने त्यांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी रात्री १० ते मंगळवारी पहाटे ६ पर्यंत शहर आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, रात्रीची वाहतूक एकदम कमी झाली होती. रात्रीचा पाऊस धडकी भरवणारा होता. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमवारपाठोपाठ मंगळवारीही सुटी जाहीर केली.

Heavy Rain
Ambegaon Crime: आंबेगावमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू; संशयित पती फरार, मंचर पोलिसांचा तपास सुरू

सोमवारी रात्री १० ते मंगळवारी स. ९ पर्यंतचा पाऊस (मि.मी.)

शिवाजीनगर ९७.५, पाषाण ११५.६, लोहगाव १७४, चिंचवड २६८, एनडीए ९३.५, कात्रज, आंबेगाव १०१.२, खडकवासला ११०, वारजे १०४.८, डेक्कन ९४.

मंगळवारचा पाऊस (सायंकाळी ७.३० पर्यंत) मि.मी.

शिवाजीनगर २१.७, पाषाण २३, लोहगाव ९.२, चिंचवड १३.५, लवळे ३, आंबेगाव, कात्रज : १८.२, खडकवासला २०.४, वारजे १५.२, डेक्कन १४.

आजच्या दिवस घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

बुधवारी (दि. ८ जुलै) पुणे आणि सातारा घाटमाथ्याला मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे बुधवारचा दिवस शहरात पाऊस राहील. मात्र, गुरुवारपासून घाटमाथ्यावरील मोठ्या पावसाचे अलर्ट क्षीण झाल्याने पाऊस कमी होण्याचे संकेत आहे.

Heavy Rain
Wari Toll Exemption: वारीसाठी टोलमाफीची घोषणा; तरीही बेलसर टोलनाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूल?

शहरात सात दिवसांत झाडपडीच्या २१२ घटना

शहरात संततधार पावसाने सोमवारी रात्री ते मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत झाडपडीच्या ६६ घटना, तर गेल्या सात दिवसांत २१२ झाडपडीची नोंद झाली. अग्निशमन दलाकडून सतर्कता बाळगत या सर्व ठिकाणी जाऊन आपली कामगिरी बजावली. यात कुणीही गंभीर जखमी किंवा जीवितहानी नाही झाली नाही. हे जवान गेले ७२ तास अहोरात्र काम करीत होते.

हायटेन्शन तारेचा शॉक लागून तो झाडावर अडकला...

शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजता भारती हॉस्पिटल रस्ता भागात एक व्यक्ती झाडाच्या छाटणीचे काम करीत असताना फांदीचा स्पर्श महावितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईनला होताच शॉक लागून ती व्यक्ती दोन फांद्यांमध्ये अडकलेला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित धाव घेत शिडी झाडाला लावून दोरीच्या साह्याने त्या व्यक्तीस सुखरूप खाली आणले. उपचारासाठी भारती रुगणालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी कात्रज अग्निशमन केंद्राचे उप अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, फायरमन प्रशांत कुंभार,अक्षय देवकर, योगेश कुंभार, मयुर काटे यांनी कामगिरी पूर्ण केली.

Heavy Rain
Pune Rains: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले; कुठे दरड कोसळून मार्ग बंद, कुठे पुल पाण्याखाली? वाचा सविस्तर

खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली

वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी (दि.७) सकाळी खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकल्याची घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. पावसामुळे लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणवर साचले होते. पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्या वेळी लोहगाव-वाघोली रस्त्यावरून निघालेल्या बसचालकाने पाण्यात बस नेली. पाण्यात बस अडकली. पाण्यातून मार्ग काढता न आल्याने बसचालक गोंधळला. रस्त्यावर साधारणपणे चार ते पाच फूट पाणी साचल्याने बसचालकासह कर्मचाऱ्यांना बसमधून बाहेर पडता येणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. पुणे महापालिका, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी बसमधील सर्वांना दोराचा वापर करून बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news