Pune Rain Update: पुण्यात पावसाची दमदार एन्ट्री! सातारा, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Pune Rain Update: पुण्यात दुपारनंतर अचानक हवामान बदलले असून हडपसरसह काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.
Pune Rain Update
Pune Rain UpdatePudhari
Published on
Updated on

Pune Rain Update: उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुण्यात आज दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची सुरुवात झाली आहे. विशेषतः हडपसर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारपासून वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. काळे ढग दाटून आले आणि काही भागांत वाऱ्याचा वेगही वाढला. त्यानंतर हडपसरसह शहरातील काही भागांमध्ये पावसाने जोर धरला. अचानक आलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Pune Rain Update
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीला 'झुरळ' हे निवडणूक चिन्ह मिळणार नाही, काय आहे निवडणूक आयोगाचा नियम?

दरम्यान, हवामान विभागाने २२ मे रोजी दुपारी २:३५ वाजता पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. राज्यात पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारांसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Pune Rain Update
OBC Creamy Layer: आई वडील IAS असतील, तर आरक्षण कशाला… ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

प्रशासनाने नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत न थांबणे, झाडांखाली आश्रय न घेणे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुढील काही तास पुणे आणि परिसरात हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news