Pune Rain Update | पुण्यातील पूरस्थिती गंभीर, मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

पुण्यात अतिवृष्टीने हाहाकार, बचावकार्य वेगाने
Pune Rain Update
पुण्यात एनआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.Pudhari photo

पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या (Pune Rain Update) पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा. (Pune rain news)

Pune Rain Update
Pune Rain Update | सतर्कतेचा इशारा ! खडकवासला धरण परिसरात 100 मिमी. पावसाची नोंद

पुणे जलमय, एकता नगरमध्ये बचावकार्य

पुण्याच्या सखल भागात पडलेल्या अविरत पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अशा परिस्थितीत पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदतकार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. (Red alert in pune today)

Pune Rain Update
पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान दाखल झाले आहेत.Pudhari Photo
Pune Rain Update
Pune Rain News : पुण्यात ३२ वर्षातील सर्वाधिक पाऊस, पर्जन्यवृष्टी 'सेंटिमीटर'मध्ये मोजण्याची वेळ

लष्कराची अतिरिक्त पथके सज्ज

तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील. (Pune city rain news) भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Pune flood)

Pune Rain Update
Pune Rain Update : लवासा सिटीत दरड कोसळली, दोन ते तीन जण अडकल्याचा अंदाज

लष्कराचे जवान बचावकार्य

आज, २५ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण ८५ जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालादेखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले संपूर्णपणे जय्यत तयारीत आणि सुसज्ज आहेत. (Pune rain news today)

Pune Rain Update
Pune Rain Updates | पुण्यात पावसाने हाहाकार; अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news