Pune Rain Update : लवासा सिटीत दरड कोसळली, दोन ते तीन जण अडकल्याचा अंदाज

अंदाजे तीन बंगले ढिगाऱ्याखाली दबले
A fissure collapsed in Lavasa City, two to three people are estimated to be trapped
मुळशी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोसे खोऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे.Pune Rain Update

खारावडे : मुळशी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोसे खोऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे दासवे लवासा सीटी इथे दरड कोसळून दोन ते तीन बंगले मातीखाली गाडले गेले आहेत. तसेच या परिसरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक बंद होऊन रस्ते खचले आहेत. या परिसरात पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लवासा सिटी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील दोन ते तीन बंगल्यांवर दरड कोसळून संपूर्ण बंगले मातीखाली गाडले गेले आहे, तर काही बंगल्यांचा भाग रस्त्यावर येऊन वाहतूक बंद झाली आहे. येथील एका बंगल्यामध्ये लाईटचे काम करण्यासाठी दोन माणसे निवासाला होती, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. त्या कामगारांचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे ते दोन्ही कामगार बंगल्यातून बाहेर पडले की बंगल्यात अडकून पडलेत हे समजू शकले नाही. त्यामुळे सध्या तरी हे दोन्ही कामगार बेपत्ता असल्याची माहिती नागरिक देत आहे.

लवासा सीटी ते वरसगाव या रस्त्यावरील अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. संपूर्ण मौसे खोऱ्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे विद्युत काम कोसळून विज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोसे व लवासा सिटी परिसरात संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news