पुणे रेल्वे स्थानकावर ‘फ्री वे’; प्रवाशांकरिता नियोजन

पुणे रेल्वे स्थानकावर ‘फ्री वे’; प्रवाशांकरिता नियोजन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानक आणि परिसरात रस्त्यातच बसणार्‍या, झोपणार्‍या प्रवाशांमुळे ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाकडून पुणे रेल्वे स्थानकावर 'फ्री वे' तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरळीतपणे ये-जा करता येत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील वेटिंग रूम (प्रतीक्षालय) देखील फुल्ल भरून वाहत आहेत.

त्यामुळे गाडीच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि परिसरात जागा मिळेल, तिथेच आपले साहित्य ठेवून बसत आहेत. त्यामुळे इतर ये-जा करणार्‍या प्रवाशांना अडचण होते. त्यावर शक्कल लढवत आरपीएफकडून प्लास्टिक बॅरिकेड लावून, 'फ्री वे' तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांचा अडथळा इतर ये-जा करणार्‍या प्रवाशांना होत नाही. परिणामी, येथून प्रवाशांची ये-जासुध्दा सुरळीत सुरू झाली आहे.

प्रवासी रस्त्यातच आपले साहित्य ठेवून बसल्यामुळे इतर प्रवाशांना ये-जा करताना अडचण येत होती. त्यामुळे आम्ही पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॅरिकेड लावून 'फ्री वे' तयार केला आहे. यात स्थानकावरील अंब्रेला गेटपासून मेन गेट प्रवेशद्वार आणि तेथून पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना होणारी अडचण कमी झाली आहे.

– बी. एस. रघुवंशी, निरीक्षक, आरपीएफ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news