Pune Rail Madad Medical Assistance: ‘रेल मदत’ ठरतेय प्रवाशांसाठी देवदूत; ३,८८२ प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय उपचार

पुणे रेल्वे विभागाची तत्पर सेवा; चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १,३९३ प्रवाशांना वैद्यकीय मदत
Indian Railway
Indian RailwayPudhari
Published on
Updated on

पुणे: रेल्वेच्या पुणे विभागाला ‌’रेल मदत‌’ हेल्पलाइनच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल ३ हजार ८८२ प्रवाशांना प्रवासादरम्यान वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात यश आले आहे. यामध्ये सन २०२५-२६ या वर्षभरातील २ हजार ४८९ रुग्ण आणि चालू आर्थिक वर्षातील (सन २०२६-२७) पहिल्या पाच महिन्यांतील (एप्रिल ते ऑगस्ट) १ हजार ३९३ रुग्णांचा समावेश आहे.

Indian Railway
Supe Ghat ST Bus Accident: सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली; चार विद्यार्थी जखमी

आपत्कालीन परिस्थितीत क्षणाचाही विलंब न लावता तातडीने आरोग्यसेवा पुरवत रेल्वे प्रशासनाने या ३ हजार ८८२ प्रवाशांसाठी हे पोर्टल खऱ्या अर्थाने देवदूत ठरवले आहे. पहिल्या पाच महिन्यांतच ३३ ते ६४ टक्क्यांची वाढ दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०२५-२६ च्या तुलनेत चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत वैद्यकीय मदतीच्या तक्रारी आणि उपचारांत मोठी वाढ झाली असल्याचे समोर येत आहे.

Indian Railway
Pune Ganeshotsav Dekhava: कसबा पेठेत ‘देखावा फिव्हर’; पर्यावरणपूरक सजावटीपासून ऐतिहासिक प्रतिकृतींपर्यंत बाप्पाचे आकर्षण

विविध आजारांसह आपत्कालीन स्थितीत मिळते मदत

तातडीने समन्वय आणि उपचार ‌’रेल मदत‌’ ॲप, पोर्टलवर आणि १३९ हेल्पलाइन क्रमांकावर वैद्यकीय मदतीची तक्रार प्राप्त होताच त्याला प्राधान्य दिले जाते. ट्रेनमधील रेल्वे कर्मचारी, संबंधित स्टेशनचे अधिकारी, रेल्वेचे वैद्यकीय पथक आणि आवश्यकतेनुसार स्थानिक रुग्णालये, डॉक्टरांशी तत्काळ समन्वय साधला जातो. प्रवासादरम्यान ताप, सर्दी-खोकला, डोकेदुखी, किरकोळ दुखापतीसारख्या आजारांपासून ते चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा प्रसूती वेदनांसारख्या गंभीर आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

Indian Railway
Pune PM Awas Yojana: पुणेकरांचे हक्काचे घराचे स्वप्न साकारणार; सहा भागांत ५ हजार ५३ घरे उभारणार
  • एप्रिलमध्ये:२०२५ मधील १७१ घटनांच्या तुलनेत २०२६ मध्ये २८० केसेस (६४ टक्के वाढ)

  • मेमध्ये: १८७ वरून २७१ केसेस (४५ टक्के वाढ)

  • जूनमध्ये: १९० वरून २५३ केसेस (३३ टक्के वाढ)

  • जुलैमध्ये: २०१ वरून २८६ केसेस (४२ टक्के वाढ)

  • ऑगस्टमध्ये: २१७ वरून ३०३ केसेस (४० टक्के वाढ)

Indian Railway
Pune Expired Visa Foreign Nationals: कोंढव्यात व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य; २६ परदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता आणि आरोग्य, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. रेल मदत हेल्पलाइनमुळे प्रवाशांना तत्काळ मदत मिळवणे सोपे झाले आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी आमचे ऑन-बोर्ड कर्मचारी आणि स्टेशनवरील टीम क्षणाचाही विलंब न लावता प्रवाशांना मदत करतात. प्रवाशांनी कोणत्याही वैद्यकीय गरजेसाठी अथवा अडचणीच्या वेळी नि:संकोचपणे रेल्वेच्या १३९ या रेल मदत सेवेचा वापर करावा.

हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news