Pune Property Tax Collection: पुणे महापालिकेला 2985 कोटींचा मिळकतकर; अभय योजनेचा मोठा परिणाम

पुणे महापालिकेने 2985 कोटींची वसुली केली; मात्र 3250 कोटींचे उद्दिष्ट अपूर्ण
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुणे महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करातून तब्बल 2 हजार 985 कोटी रुपयांची भर पडली आहे. चार महिन्यांच्या अभय योजनेने थकबाकीदारांना दिलेल्या मोठ्या दिलास्याचा थेट परिणाम महसुलावर दिसून आला आहे. मिळकत कर थकबाकी दंडावर 75 टक्के सवलत देत राबविलेल्या या मोहिमेमुळे वसुलीत लक्षणीय वाढ झाली असली, तरी समाविष्ट 32 गावांवरील कर स्थगितीमुळे अपेक्षित 3 हजार 250 कोटींचे उद्दिष्ट मात्र अपूर्णच राहिले आहे.

Property Tax
Pune TDR Approval Process: टीडीआर मंजुरीत वेग; पुण्यात दुसरा टप्पा एका दिवसात पूर्ण

महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकत करातून 3 हजार 250 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. या पार्श्वभूमीवर 15 नोव्हेंबर ते 15 मार्च या कालावधीत सर्वसाधारण थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दंडाच्या रकमेवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली. मोबाईल टॉवर्स वगळता निवासी आणि व्यावसायिक मिळकतींची थकबाकी सुमारे 3 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.

Property Tax
Pune River CCTV Flood Monitoring: पुण्यात पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर CCTV; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

अभय योजनेचा कालावधी वाढवून आणि सर्वसामान्यांना दिलेल्या सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली झाली. या चार महिन्यांत नियमित कर आणि थकबाकीसह मिळून 2 हजार 985 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले. मात्र, राज्य शासनाने समाविष्ट 32 गावांतील थकबाकी वसुलीला स्थगिती दिल्यामुळे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही.

Property Tax
Baramati WhatsApp Investment Fraud: व्हॉट्सअॅप गुंतवणूक आमिषाला बळी; बारामतीतील दाम्पत्याला 1.30 कोटींचा गंडा

दरम्यान, दंडावरील 75 टक्के सवलतीमुळे सुमारे 800 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेची थकबाकी सुमारे 1 हजार 750 कोटी रुपयांनी घटली आहे. याचबरोबर, 2026-27 या आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकत कर विभागाने बिले तयार केली.

Property Tax
bombay high court Land Acquisition HC Judgment: बारामती-फलटण महामार्ग प्रकरणात जुना निवाडा रद्द, हायकोर्टाचा निर्णय

जुन्या हद्दीतील सुमारे 10 लाख मिळकतींपैकी 9 लाख 50 हजार मिळकतींची बिले ऑनलाइन वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उर्वरित बिलेही रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. तसेच मध्यरात्रीनंतर ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा सुरू होणार आहे. समाविष्ट गावांतील बिले तयार करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news