Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यात कार्यरत असलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला. मद्यधुंद अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव पोर्श कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने ते दोघेही ठार झाले. यावर मध्य प्रदेशातील मृत अभियंता अनिश अवधिया याच्या कुटुंबियांनी 'हा अपघात नाही, तर हत्या आहे' (Pune Porsche Car Accident) असा आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.

पुण्यातील अपघातात मृत अभियंता अनिश अवधिया याचा ज्याप्रकारे अपघात झाला. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने त्यांचा मुलगा गमावला त्यामुळे अनिश याचे कुटुंबीय हादरले आहेत. एका दृश्यांमध्ये अनिशचे नातेवाईक एकमेकांना मिठी मारून रडताना दिसतात. त्यांचे काका अखिलेश अवधिया म्हणाले, "अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि ताशी २४० किमी वेगाने गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे 'ही हत्या आहे, अपघात नाही."

अनिशचे आजोबा आत्माराम अवधिया म्हणाले की, पुण्यातील प्रख्यात बिल्डरचा मुलगा किशोर ड्रायव्हरला जामीन मिळायला नको होता. "या अपघातात दोन जणांचा जीव गेला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अपघातातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे आमचे मत आहे. त्यामुळे आरोपींना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा," अशी इच्छा मृत अनिश याच्या आजोबांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news