Pune Police Crime News: गर्भात मुलगी असल्याचे कळताच जबरदस्ती गर्भपात अन् खुनाचा प्रयत्न; पुण्यात पोलिस उपनिरीक्षक अडचणीत

बेकायदेशीरपणे केले गर्भलिंगनिदान : मुलगी असल्याने जबरदस्तीने गर्भपात
Pune Police Sub Inspector Case
Pune Police Sub Inspector CasepUDHARI
Published on
Updated on

पुणे: पत्नीचा छळ करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, मांजरी पोलिस ठाण्यात कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तिचा गळा दाबत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने बेकायदेशीरपणे गर्भलिंगचाचणी करून गर्भात मुलगी असल्याचे समजल्यावर पत्नीवर गर्भपातासाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

धनाजी रंगराव टोणे आणि अनसूया रंगराव टोणे (रा. पी. एस. व्हिला, शेवाळेवाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत टोणे याच्या पत्नीने मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर टोणे सुटीवर गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pune Police Sub Inspector Case
Dengue Cases in Pimpri: शहरात वाढतोय डेंग्यूचा डंख; मलेरियाचे दोन, तर डेंग्यूचे १६ पॉझिटिव्ह रुग्ण

आरोपी पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि फिर्यादी महिलेचा विवाह १९ मे २०१९ रोजी झाला. लग्नानंतर दोन महिन्यांतच टोणे याने पत्नीचा मानसिक छळ करणे सुरू केले. ‘तू नोकरी कर, कमव’, म्हणत पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२०२० मध्ये पत्नी गर्भवती असतानाही तिला दर तीन-चार दिवसांनी मारहाण केली. सात महिन्यांची गर्भवती असताना तिच्या अंगावर बसून बेदम मारहाण केल्याचा आरोपही तिने केला.

मे २०२५ मध्ये धनाजी टोणे आणि त्यांची आई अनसूया यांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी केली. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर दोघांनी तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला.

गर्भपात न केल्यास दोन्ही मुलींना घेऊन माहेरी जाण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप तक्रारीत केला. कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी टोणे याने पत्नी आणि मुलीच्या अंगवर उकळते दूध फेकण्याचा प्रयत्न केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

Pune Police Sub Inspector Case
Moshi Waste to Energy Project: बायो-सीएनजीच्या नावाखाली कमाईचे कुरण? अधिकारी, सल्लागारांच्या कार्यपद्धतीवर शंका

पोलिस आयुक्तांकडे तक्रार; पुन्हा मारहाण

गर्भपातानंतर महिलेने पोलिस उपायुक्तांकडे पतीविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्तांनी धनाजी टोणे याला सक्त भाषेत समज दिली. याचा राग मनात ठेवून ‘तू तक्रार का केलीस,’ असे म्हणत टोणे याने परत पत्नीला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. फिर्यादीचे वडील टोणे याला समजावून सांगण्यासाठी आले असताना त्यांना देखील त्याने शिवीगाळ केली आहे.

२०२२ मध्ये टोणेवर एसीबीकडून गुन्हा

धनाजी टोणेविरुद्ध २७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा राग मनात ठेवून त्यांनी पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याचा आरोपही तक्रारीत आहे. या घटनेनंतर टोणे घरातील साहित्य घेऊन सुमारे महिनाभर घराबाहेर राहिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक इरफान नदाफ करीत आहेत.

गर्भलिंगनिदान चाचणी करणारा कोण?

गर्भलिंगनिदान चाचणी करण्यास बंदी आहे. असे असाताना देखील टोणे आणि त्याच्या आईने पत्नीची एका खेडेगावातील शेतातील घरात पत्नीची गर्भलिंगनिदान चाचणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करणारा तो कोण असा देखील सवाल उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news