Pune Police Recruitment Scam: पुणे पोलिस भरतीत मोठा गैरप्रकार! कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे १९ जणांची नोकरी जाणार

ट्रेनिंगवरून परत बोलावून घेण्याचे आदेश
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ‘कुराश’च्या बनावट प्रमाणपत्राद्वारे पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांना नोकरीतून कायमचे काढून टाकण्याच्या निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, हा गैरप्रकार समोर आल्यानंतर दहा जणांना हजर करून घेण्यात आले नव्हते.

तर त्या अगोदर नऊ जणांना विविध प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यांना देखील आता परत बोलावून घेण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे या उमेदवारांना नोकरीतून काढून टाकण्यात आले असताना, दुसरीकडे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची देखील टांगती तलवार असणार आहे.

Police
Pune Kharadi Engineer Case: पुण्यात सायबर फसवणुकीच्या धमकीनंतर तरुण अभियंत्याचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून, महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरमार्गाने फायदा घेत पुणे शहर पोलिस दलात १९जणांनी नोकरी लाटली होती. याप्रकरणी, गुन्हे शाखेने कारवाई करत महाराष्ट्र राज्य कुराश असोशिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे या दोघांसह चौघांना अटक केली होती. त्यामध्ये श्रृती पुनगावकर आणि तिचे पती धैर्यशील पुनगावकर या दोघांचा समावेश आहे.

हे दोघे क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवत होते. त्यांच्याच केंद्रात कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. तर परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख व इतर जिल्ह्यांच्या संघटकांसह आणखी काही जणांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार २०१६ ते २०२६ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.

Police
Pune Cleaning Contract: पुण्यात स्वच्छतेच्या कंत्राटात नेमकं काय सुरू? ४२ कोटींच्या कामावर प्रश्न, अहवाल ३० ऑक्टोबरला

...असा आला प्रकार उजेडात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस दलाच्या सन २०२४-२६ च्या भरतीत १९ उमेदवार कुराश व ड्रॅगनबोट या खेळांचे खोटे प्रमाणपत्र मिळवून भर्दी झाले असल्याची माहिती एका व्यक्तीला मिळाली होती. त्यांनी याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. त्याचबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत आरोपींनी प्रत्यक्षात २०२१६ ते २०२६ या कालावधीत कुराश या खेळाच्या स्पर्धा कोणत्याही ठिकाणी न घेता त्या घेतल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली.

प्रत्यक्षात जे उमेदवार कुराशचे खेळाडून नाहीत हे माहिती असता त्यांचा खेळाडूचा अभिलेख तयार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्या प्रमाणपत्राचा वापर करून या उमेदवारांनी विविध खात्यात खेळाडू आरक्षणातून नोकरी मिळवली. त्यापैकी पुणे शहर पोलिस दलात १९ जण या खेळाच्या प्रमाणपत्राचा वापर करून भर्ती झाले आहेत.

त्या १९ संघटना रडारवर

कुराश खेळाचे तालुका, जिल्हास्तरापासून ते राज्य पातळीपर्यंत आयोजन करणाऱ्या १९ संघटना आणि त्या संघटना चालविणाऱ्या व्यक्तीदेखील पुणे पोलिसांच्या रडावर आहेत. त्यांची माहिती गुन्हे शाखेकडून एकत्रित केली आहे. त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news