Pune Police Constable Suspension: पुण्यात पोलिस हवालदार निलंबित; पबमध्ये सापडल्याने पत्नीचा छळ उघड

कोम्बिंग ड्युटी सांगून पबमध्ये महिलेबरोबर आढळल्याचा प्रकार; पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई
  Police suspension
Police suspensionPudhari
Published on
Updated on

पुणे: कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी असल्याचे खोटे सांगून प्रत्यक्ष मात्र पबमध्ये महिलेबरोबर मज्जा मारत असताना पत्नीने पकडल्यानंतर पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीरवस्ती, वडकी) असे निलंबित केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

  Police suspension
PMPML Driver Training: पीएमपीएमएल चालकांसाठी सीआयआरटी प्रशिक्षण सक्तीचे; रस्ते सुरक्षेला प्राधान्य

कांबळे याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीने कौटुंबिक छळाची फिर्याद काळेपडळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांबळे आणि एका महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळेच्या वर्तनामुळे शिस्तबद्ध असलेल्या पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्याला पोलिस खात्यातून निलंबित केले आहेे.

  Police suspension
Baramati Crime: बारामतीत थरारक घटना! जमिनीच्या वादातून वडील, सावत्र आई आणि भावाकडून तरुणाची हत्या

काय आहे प्रकार?

कांबळेच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार हनुमंत कांबळे याने एका महिलेसोबत संगनमत करून, त्यांच्या दोघांचे अनैतिक संबंध लपवून ठेवले. पतीने पोलिस असल्याचे व वर्दीचा धाक दाखवून वेळोवेळी मारहाण केली. तसेच घरातून हाकलून देत घटस्फोट देण्याची धमकी देऊन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

  Police suspension
Ashtavinayak Temple Closure 2026: अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद

तसेच आरोपी महिलेने देखील फिर्यादींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादींचा पती अनेकदा त्यांच्यासोबत खोटे बोलत होता. फिर्यादींनी पतीला आणि महिलेला अनेकदा पकडले होते. 15 जून 2026 रोजी फिर्यादींनी पती कांबळेला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बींगची ड्युटी असल्याचे सांगितले.

  Police suspension
Pune Airport Summer Rush: उन्हाळी सुट्यांचा पुणे विमानतळावर परिणाम; प्रवाशांची संख्या 18 हजारांच्या पार

प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील सी डॉक या पबमध्ये त्या महिलेसोबत दारू पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर मी पोलिस आहे. तू काही करू शकत नाही, असे बोलला. दरम्यान, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत पती आणि महिलेच्या विरुद्ध तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news