PMPML Bus Driver Monitoring System: पीएमपी बसचालकांवर आता 'तिसऱ्या डोळ्याची' नजर; १ हजार बसमध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम

मोबाईलवर बोलणे, रील्स पाहणे अन् हेडफोन वापरणाऱ्यांवर नियंत्रण कक्षाची नजर; निष्काळजी चालकांवर होणार कारवाई
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: प्रवासादरम्यान पीएमपी बसचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या एक हजार नवीन बसमध्ये ‌'अत्याधुनिक ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम‌' बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे आता बस चालवणाऱ्या चालकांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षाची थेट करडी नजर असणार आहे.

PMPML
Pune Diwali Garbage: दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा डोंगर; रोजच्या संकलनात ३०० टनांची वाढ

काही घटनांमध्ये पीएमपी चालक गाडी चालवताना

मोबाईलवर बोलणे, सोशल मीडियावर रील्स पाहत गाडी चालवणे, कानात हेडफोन घालून बस चालवणे किंवा इतर कारणांमुळे लक्ष विचलित होणे, अशा बेजबाबदार गोष्टी करीत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे थेट तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारांची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनाने हे आधुनिक तंत्रज्ञान अमलात आणण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

PMPML
Pune Diwali Air Pollution: फटाक्यांच्या आतषबाजीने पुण्याचा श्वास कोंडला; हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

...अशी करेल ही यंत्रणा काम

या नव्या प्रणालीनुसार, बसच्या स्टेअरिंगसमोर चालकावर लक्ष ठेवणारा एक विशेष सेन्सरयुक्त कॅमेरा बसवला जाईल. बस चालवत असताना चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित झाले, त्याने मोबाईलचा वापर करण्याचा प्रयत्न केला, कानात हेडफोन घातले किंवा इकडे-तिकडे पाहिले, तर ही यंत्रणा तत्काळ चालकाच्या या हालचालींची अचूक नोंद घेईल.

PMPML
Sugar Factory Weighbridge Inspection: ऊस गाळप हंगामापूर्वी १६२ साखर कारखान्यांचे वजनकाटे सील; काटामारी रोखण्यासाठी सरकारची तपासणी मोहीम

ही नोंद होताच त्याच क्षणी हा अलर्ट पीएमपीच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) पाठवला जाईल. यामुळे नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती मिळून संबंधित चालकावर तातडीने दंडात्मक किंवा शिस्तभंगाची कारवाई करणे शक्य होणार आहे.

PMPML
Uruli Kanchan Road Accident: दिवाळीच्या जेवणाचे पार्सल आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू; भरधाव कारच्या धडकेत दोघांचा अंत

प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही पीएमपी प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे किंवा लक्ष विचलित होणे, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. अशा निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठीच आम्ही नवीन येणाऱ्या एक हजार बसमध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम बसवत आहोत. या तंत्रज्ञानामुळे चालकांच्या चुकीच्या हालचालींवर तत्काळ लक्ष ठेवून, त्यांच्यावर नियंत्रण कक्षातून कारवाई केली जाईल. पीएमपीचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.