Pune Diwali Air Pollution: फटाक्यांच्या आतषबाजीने पुण्याचा श्वास कोंडला; हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरावर १२ तास धुराचे साम्राज्य; एकाच रात्रीत आगीच्या ९४ घटना, दिल्ली-मुंबईलाही टाकले मागे
Diwali Air Pollution
Diwali Air PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १२ दरम्यान झालेल्या फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीमुळे शहराचे अक्षरशः धुराडे झाल्याचे दिसून आले. सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे घरांतही श्वास घेणे कठीण झाले होते. पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता २८१ ते ५५१ मायक्रो ग्रॅम प्रतिचौरस मीटरच्या वर गेल्याने घातक श्रेणीत पोहचली. विषारी धुराबाबतीत यंदा पुणेकरांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद या शहरांनाही मागे टाकले. एकाच रात्रीत तब्बल ९४ आगीच्या घटना घडल्याने अग्निशमन जवानांची रात्रभर प्रचंड धावपळ झाली.

Diwali Air Pollution
Sugar Factory Weighbridge Inspection: ऊस गाळप हंगामापूर्वी १६२ साखर कारखान्यांचे वजनकाटे सील; काटामारी रोखण्यासाठी सरकारची तपासणी मोहीम

शहरात रविवारी सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत फटक्यांचा फारसा आवाज आला नाही. त्यामुळे यंदा कमी फटके फुटणार, असे वाटत असतानाच सायंकाळी ७ नंतर जोरदार आतषबाजीला सुरुवात झाली. शहरातील प्रत्येक गल्लीबोळातून लडी, बाॅम्ब अन् आकाशात उंचावर जाऊन फुटणाऱ्या फॅन्सी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. त्यामुळे रात्री ८.३०च्या सुमारास अवघे शहर धुरात हरवले होते. घराच्या गच्चीवरून नेहमी सुंदर दिसणारा परिसरच धुरात गायब झाला होता. इमारती दिसेनाशा झाल्या होत्या. सोमवारी पहाटेपर्यंत फॉगऐवजी स्मॉग दिसत होता. प्रदूषण कमी झाले ते सकाळी ८ नंतर. तब्बल १२ तास शहरावर धुराचे लोळ साचलेले होते.

Diwali Air Pollution
Uruli Kanchan Road Accident: दिवाळीच्या जेवणाचे पार्सल आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू; भरधाव कारच्या धडकेत दोघांचा अंत

धुरामुळे लक्ष्मी रस्त्यावर श्वास घेणे झाले होते कठीण

सायंकाळी सातपासून रात्री साडेअकरापर्यंत शहराच्या अनेक भागांमध्ये धुराचे दाट थर पसरले होते. उंच इमारतीही धुराच्या पडद्याआड गेल्या होत्या. रस्ते, चौक आणि निवासी भागांमध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. अनेक घरांमध्ये खिडक्या-दारे बंद करूनही धुराचा त्रास जाणवत होता. लक्ष्मी रस्त्यावर तर श्वास घेणेही कठीण झाले होते. नाकावर मास्क, दोन रुमाल बांधून देखील श्वास घेण्यास खूप त्रास झाला.

Diwali Air Pollution
Shetphalgarhe Medicine Theft Case: शेटफळगढे आरोग्य केंद्रातील औषध चोरीवरून संताप; पोतभर औषधांची किंमत फक्त ४ हजार ५७ रुपये?

दर तासाला मोजली हवेची गुणवत्ता; १२ तास खराब श्रेणी

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे यांच्या एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग प्रणालीच्या निरीक्षणानुसार, रविवारी रात्री ९ वाजता पुण्याची सरासरी हवेची गुणवत्ता २१८ वर पोहचली. शिवाजीनगरमध्ये रविवारी रात्री १०.१० वाजताच्या सुमारास हा निर्देशांक २५६ ते २८१ नोंदविण्यात आला. त्यामुळे हवेची गुणवत्ता 'वाईट' श्रेणीत पोहचली होती. दर तासाला हवेची गुणवत्ता मोजली गेली. ती तब्बल १२ तास खूप खराब या श्रेणीत होती.

Diwali Air Pollution
Pune Resident Deputy Collector: पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग! ज्योती कदम यांच्या बदलीनंतर पद रिक्त

शहराच्या हवाप्रदूषणाचे आकडे वेगवेगळे

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ : २८१ ते ३०० मायक्रोग्रॅम प्रि चौ. मी.

  • अमेरिकन संस्थेच्या नोंदीनुसार : ४५१

  • गुगलच्या नोंदीनासर : ८५०

कोणत्या भागात किती हवा प्रदूषित...

(स्रोत : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटीएम, पुणे)

  • शिवाजीनगर : २५६

  • पिंपरी-चिंचवड : २३६

  • लोहगाव : १७३

  • गवळीनगर : २१९

  • कात्रज : १५१

  • वाकड : १४७

  • पुणे विद्यापीठ : ११३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.