Pune PMPML Bus Accident: गणेशखिंड रस्त्यावर पीएमपीएमएल बसची सायकलला धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मेरिडियन प्लाझाजवळ अपघात; बसचालकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

पुणे: पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोहेल नूर अन्सारी (वय २१, सध्या रा. जनवाडी, गोखलेनगर; मूळ रा. बिहार), असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

PMPML
Pune Ramps for Disabled: दिव्यांगांसाठी पुणे महापालिकेचा मोठा पुढाकार; शहरातील ५० सार्वजनिक ठिकाणी रॅम्प उभारणार

याप्रकरणी बसचालक वैभव चंद्रकांत चौगुले ( रा. साधू वासवानी चौक, पुणे स्टेशन) याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेहान इक्राम अन्सारी (वय १९ , रा. जनवाडी, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.

PMPML
Ujani Dam Fishermen Protest: उजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन; दोन महिला बेशुद्ध, लेखी आश्वासनासाठी ठाम भूमिका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२९) ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून ५० मिनिटांनी गणेशखिंड रस्त्यावरील मेरिडियन प्लाझाजवळ अपघात झाला. आरोपी त्याच्या ताब्यातील पीएमपी बस भरधाव आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता. बसने फिर्यादींच्या सायकलला जोरदार धडक दिली.

PMPML
Maharashtra Monsoon Rainfall Deficit: अल-निनोचा दणका! महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; ३२ जिल्ह्यांत पावसाची तूट

त्यांचा मित्र सोहेल हा बसच्या मागील चाकाखाली सापडला. बसचे चाक त्याच्या पोटावरून आणि पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या दुखापतींमुळे सोहेलचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक करांडे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news