Pune PMPML Mini Buses: पुणेकरांच्या प्रवासासाठी पीएमपीचा मोठा प्लॅन! शहरात ५०० मिनी बसची मागणी; मेट्रो प्रवाशांनाही फायदा

अरुंद रस्त्यांवरील वाहतुकीसाठी ७ मीटरच्या बस; मेट्रो स्थानकांसाठी फिडर सेवा सुरू करण्याचे नियोजन
Metro PMPML
Metro PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासोबतच, शहरातील मेट्रोसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी पीएमपीने केंद्र शासनाकडे ५०० मिनी बसची मागणी केली आहे. ७ मीटर लांबीच्या असणाऱ्या या बस ताफ्यात दाखल झाल्यास पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

Metro PMPML
Kondhwa Diwali Mud Forts: शहरीकरणाच्या विळख्यात मातीचे किल्ले हरवले! कोंढव्यातील चिमुकल्यांना ऑनलाइन खरेदीचा आधार

पुणे शहरातील मध्यवर्ती आणि जुन्या भागांमधील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे १२ मीटर किंवा ९ मीटर लांबीच्या मोठ्या बस या भागातून चालवताना पीएमपी प्रशासनाला आणि चालकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडी वाढते आणि नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पुरेसा लाभ मिळत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ७ मीटरच्या छोट्या मिनी बस अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

Metro PMPML
Pune Divorce Parenting Plan: घटस्फोट घेतानाही पालकत्वाची वीण घट्ट; मुलीसाठी आई-वडिलांचा 'पॅरेंटिंग प्लॅन'

मेट्रोसाठी ''फिडर सेवा'' आणि मध्यवर्ती भागात कनेक्‍टिव्हिटी

या मिनी बसचा मुख्य वापर दोन प्रमुख कारणांसाठी केला जाणार आहे. मेट्रोस्थानकांपर्यंत प्रवाशांना पोहोचवण्यासाठी आणि मेट्रोतून उतरल्यानंतर पुढील प्रवासासाठी या बस फिडर सेवा म्हणून चालवल्या जातील.

Metro PMPML
PMPML Bus Driver Monitoring System: पीएमपी बसचालकांवर आता 'तिसऱ्या डोळ्याची' नजर; १ हजार बसमध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम

तसेच पेठ भाग, अरुंद रस्ते आणि अंतर्गत गल्लीबोळांमध्ये या बस सहजपणे फिरू शकतील, त्यामुळे मध्यवर्ती भागातील नागरिकांना थेट सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. केंद्र शासनाकडून या ५०० बस मिळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे.

Metro PMPML
Pune Diwali Garbage: दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा डोंगर; रोजच्या संकलनात ३०० टनांची वाढ

या मागणीला मंजुरी मिळून बस ताफ्यात समाविष्ट झाल्यास, पीएमपीची एकूण प्रवासी वाहन क्षमता वाढणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईलच, शिवाय मध्यवर्ती पुण्यातील नागरिक आणि मेट्रो प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.