Pune Divorce Parenting Plan: घटस्फोट घेतानाही पालकत्वाची वीण घट्ट; मुलीसाठी आई-वडिलांचा 'पॅरेंटिंग प्लॅन'

पुण्यातील आयटी क्षेत्रातील दाम्पत्याचा सामंजस्याने निर्णय; शिक्षण, संगोपनापासून भविष्यातील सुरक्षिततेपर्यंत जबाबदारी वाटून घेतली
Divorce Parenting Plan
Divorce Parenting PlanPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे शक्य नसले, तरी आई-बाबा म्हणून आपल्या जबाबदारीत कोणतीही उणीव राहू नये, आपल्यातील मतभेदांची झळ लाडक्या मुलीला बसू नये, या भावनेतून आयटी क्षेत्रातील एका दाम्पत्याने घटस्फोट घेतानाही पालकत्वाचे नाते जपण्याचा आदर्श घालून दिला आहे.

Divorce Parenting Plan
PMPML Bus Driver Monitoring System: पीएमपी बसचालकांवर आता 'तिसऱ्या डोळ्याची' नजर; १ हजार बसमध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम

दहा वर्षांच्या मुलीचे शिक्षण, संगोपन, सुट्ट्या आणि सणासुदीच्या भेटींपासून ते भविष्यातील तिच्या सुरक्षिततेपर्यंत सर्व बाबींचा ‘पॅरेंटिंग प्लॅन’ तयार करून दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेतला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. यादव यांनी या निर्णयाचे कौतुक करीत घटस्फोटाचा दावा निकाली काढला. आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या रमेश आणि स्मिता (नावे बदललेली आहेत) यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

Divorce Parenting Plan
Pune Diwali Garbage: दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा डोंगर; रोजच्या संकलनात ३०० टनांची वाढ

त्यांना दहा वर्षांची मुलगी आहे. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे गेल्या साडेचार वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. मुलगी आईकडे राहत असली, तरी वडील नियमित तिच्या संपर्कात होते. दोघेही तिच्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. अखेर त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या विभक्त होण्याची किंमत मुलीला मोजावी लागू नये, यासाठी दोघांनी सामंजस्याने तिच्या संगोपनाचे नियोजन केले.

Divorce Parenting Plan
Pune Diwali Air Pollution: फटाक्यांच्या आतषबाजीने पुण्याचा श्वास कोंडला; हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

मुलीचा ताबा आईकडे ठेवण्यासह शिक्षणाचा खर्च दोघांनी निम्मा-निम्मा उचलण्याचे ठरविले. त्यासाठी दरवर्षी बँकेत ठरावीक रक्कम जमा करणे, शिक्षणासंबंधी महत्त्वाचे निर्णय एकत्र घेणे, तसेच सुट्ट्या आणि सणासुदीला मुलगी कोणासोबत राहणार, हेही निश्चित केले. विशेष म्हणजे, आई किंवा वडिलांपैकी एकाचा अथवा दोघांचाही मृत्यू झाल्यास मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा सांभाळ कोण करणार, याचीही तरतूद केली. हा संपूर्ण आराखडा घटस्फोटाच्या दाव्यात सादर करण्यात आला. ‘आम्ही वेगळे होत असलो, तरी आमच्या मतभेदांचा परिणाम मुलीवर होऊ देणार नाही. तिच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी दोघांनी समान वाटून घेतली आहे,’ अशी भूमिका दाम्पत्याने न्यायालयात मांडली.

Divorce Parenting Plan
Sugar Factory Weighbridge Inspection: ऊस गाळप हंगामापूर्वी १६२ साखर कारखान्यांचे वजनकाटे सील; काटामारी रोखण्यासाठी सरकारची तपासणी मोहीम

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; आई-बाबांचा होत नाही. पालकांमधील वादाचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मुलांना दोघांचेही प्रेम आणि सहवास आवश्यक असतो. त्यामुळे मुलांच्या हिताचे निर्णय एकत्र घेता यावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पॅरेंटिंग प्लॅनच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचा वापर करून पालकांनी सामंजस्याने तोडगा काढावा.

ॲड. वंदना घोडेकर, दाम्पत्याच्या वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.