Pune PMC Pothole Free Mission: पुणे मनपा प्रारूप मतदार यादीत घोळ! तब्बल 22,809 तक्रारींचा ‘प्रशासनावर’ पाऊस, कर्मचाऱ्यांची दमछाक

3 लाख 446 मतदारांची नावे दुबार; सिंहगड रोड कार्यालयात सर्वाधिक आक्षेप, 10 डिसेंबरपर्यंत अंतिम
Pune PMC Pothole Free Mission
Pune PMC Pothole Free MissionPudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. तब्बल 22 हजार 809 तक्रारी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे व क्षेत्रीय कार्यालयांना प्राप्त झाल्या, तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सर्वांत कमी 87 हरकतींची नोंद झाली आहे.

Pune PMC Pothole Free Mission
Rajgurunagar Election: राजगुरुनगरमध्ये मतमोजणीच्या विलंबावर संतप्त प्रतिक्रिया! मतपेटीतील ईव्हीएमवर संशय, 'मतचोरी'च्या आरोपांमुळे राजकीय सस्पेन्स शिगेला

प्रत्येक तक्रारींचे योग्य निवारण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्याने या तक्रारींचा निपटारा करताना महापालिकेच्या निवडणूक विभाग कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. दरम्यान, या तक्रारींवर सुनावणी होणार नाही. तक्रारींची तपासणी होऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

Pune PMC Pothole Free Mission
Chakan Nagar Parishad Election: चाकणमध्ये राजकीय सस्पेन्स वाढला! 74.28% विक्रमी मतदान कोणाला तारक, कोणाला मारक?

पुणे महापालिकेची आगामी निवडणूक 41 प्रभागांमध्ये होणार आहे. या प्रभागांची प्रारूप मतदार यादी महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले असून, तक्रारींची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे यादीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या असून, 3 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्यास मुदतवाढ दिली होती. प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार झाली होती, तर काही मतदारांची नावे केवळ आजूबाजूच्या प्रभागात नाही, तर दुसऱ्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील याद्यांमध्ये आल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्या.

Pune PMC Pothole Free Mission
Saswad Nagar Parishad: सासवडला मतदानाचा टक्का घटला, धाकधूक वाढली! भाजपचे संजय जगताप आणि आमदार विजय शिवतारे यांची प्रतिष्ठा पणाला

मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वत:हून याद्यांची तपासणी सुरू केली आहे. हरकती नोंदविण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. तब्बल 22 हजार 809 नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या. यातील सर्वाधिक 6 हजार 308 तक्रारी या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाला मिळाल्या आहेत. त्याखालोखाल नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाला 5 हजार 617 तक्रारी प्राप्त झाल्या. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या तक्रारींचा निपटारा करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे.

अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत पाच दिवसांनी वाढवून 10 डिसेंबर करण्यात आली आहे, तर मतदान केंद्रांची यादी 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल तसेच मतदान केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

Pune PMC Pothole Free Mission
Indapur Nagar Parishad: इंदापूरात भरणे, पाटील, शहा, गारटकर, जगदाळे, माने यांची प्रतिष्ठा पणाला

तीन लाख 446 मतदारांची नावे दुबार

आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर केली आहे. यानुसार 35 लाख 51 हजार 469 एकूण मतदार आहेत. त्यात तीन लाख 446 मतदारांची नावे दुबार आहेत, तर 41 पैकी 10 प्रभागांमध्ये एक लाखाहून अधिक मतदार आहेत. विशेषत: दुबार मतदारांच्या मोठ्या संख्येमुळे राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. याशिवाय अनेक ठिकाणी मतदारांची पळवापळवी केली गेल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेने याद्यांचे विभाजन करण्यासाठी वापरलेल्या सॉफ्टवेअरमुळे हे प्रकार घडले असल्याचेही बोलले जात आहे. यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही आरोप झाले असून, हक्काचा मतदार अन्य प्रभागांत गेल्याने इच्छुक धास्तावले आहेत.

मतदार यादी विक्रीतून महापालिकेला मिळाले 16 लाख 20 हजार 200

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरअनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या विकत घेतल्या आहेत. या यादीतून आपल्या प्रभागतील नावे बरोबर आहेत की नाही, याची पडताळणी केली जात आहे. आत्तापर्यंत विक्री झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधून महापालिकेला 16 लाख 20 हजार 906 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Pune PMC Pothole Free Mission
Daund Nagar Parishad Election: आजी-माजी आमदारांचे भवितव्य पणाला!

क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतदार यादीवर नोंदविण्यात आलेले आक्षेप

1) निवडणूक कार्यालय सावरकर भवन - 0

2) ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय - 277

3) येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय - 589

4) नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय - 5617

5) शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय - 376

6) औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय - 434

7) कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय - 517

8) सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय - 6308

9) धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय - 122

10) वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय - 2472

11) कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय - 1110

12) हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय - 1397

13) वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय - 2186

14) कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय - 953

15) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय - 273

16) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय - 87

एकूण : 22809

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news