Pune PMC Ideal Teacher Award: पुणे महापालिकेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ जाहीर; ४० गुणवंत शिक्षकांचा होणार गौरव

आजपासून ऑनलाइन प्रस्ताव स्वीकारणार; २२ सप्टेंबर अंतिम मुदत, निवड झालेल्या शिक्षकांना लॅपटॉप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक
Teacher Award
Teacher AwardPudhari
Published on
Updated on

पुणे: शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७' जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी मंगळवार (दि. ८) पासून ऑनलाइन प्रस्ताव स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर आहे, अशी माहिती शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Teacher Award
Maza Bappa 2026: विद्यार्थ्यांच्या हातून साकारला बाप्पा; ‘माझा बाप्पा २०२६’तून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

महापालिका, तसेच अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व माध्यमांच्या पात्र शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. यंदा एकूण ४० शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील २५, माध्यमिक शाळांतील पाच, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पाच आणि अनुदानित खासगी माध्यमिक शाळांतील पाच शिक्षकांचा समावेश आहे.

Teacher Award
Junnar Extortion Case: कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी देत ४ लाखांची खंडणी?; जुन्नरमध्ये दोन नगरसेवकांसह दोघांविरोधात गुन्हा

पुरस्काराची निवड प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्ताधिष्ठित ठेवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या १६ जुलै २०२५ रोजीच्या शिक्षक गुणगौरव पुरस्कारासंदर्भातील शासन निर्णयाशी सुसंगत निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्राप्त प्रस्तावांचे १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी दिलेले योगदान, तसेच अन्य उल्लेखनीय कामगिरीचा मूल्यांकनात विचार केला जाणार आहे.

Teacher Award
Ganadhish Navonmesh Competition: पुण्यात गणरायाच्या स्वागतासाठी ‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धे’चा जल्लोष; मंडळांना मिळणार ३१ हजारांचे पहिले पारितोषिक!

अर्जाची छाननी आणि मूल्यांकन करून गुणवंत शिक्षकांची निवड होणार

पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी पुणे महापालिकेचे महापौर असतील. समितीकडून प्राप्त प्रस्तावांची निर्धारित निकषांनुसार छाननी आणि मूल्यांकन करून गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांना लॅपटॉप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Teacher Award
Pune Ganeshotsav Puja Samagri: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; पुण्यात पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच अन्य शिक्षकांना गुणवत्तापूर्ण, नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. पात्र आणि इच्छुक शिक्षकांनी ८ ते २२ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news