Pune Sahakarnagar Firing: पुण्यात सहकारनगरमध्ये मेडिकलवर गोळीबार; एक जखमी, परिसरात खळबळ

शिंदे हायस्कूलजवळ रात्री १०.३० वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार; खंडणी किंवा पूर्ववैमनस्याचा संशय
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

​पुणे: सहकारनगर परिसरातील शिंदे हायस्कूलजवळ बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी एका मेडिकल स्टोअरवर अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली असून, हल्लेखोरांनी एकूण तीन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.​

Guns
Milk Adulteration Control: दूध भेसळीवर कडक कारवाईसाठी एफडीएची मोठी बैठक; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत धोरणात्मक चर्चा

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार खंडणी, टोळीयुद्ध किंवा जुन्या पूर्ववैमनस्यातून घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मेडिकलला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, हा हल्ला नेमका कोणाच्या इशाऱ्यावर झाला? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Guns
School Bus CCTV Inspection: पुण्यात स्कूल बसमध्ये CCTV तपासणी मोहीम; 20 जूनपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे RTO चे आदेश

बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शिंदे हायस्कूलजवळील मेडिकल दुकानात व्यवहार सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या; ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पळापळ झाली. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Guns
Navle Bridge Accident: नवले पुलाजवळ भीषण अपघात; सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू

​पोलिस घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोरांच्या दुचाकीचा माग काढला जात आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, दोषींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिससूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news