

पुणे : पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘पासपोर्ट ऑफिस आपल्या दारात’ या उपक्रमांतर्गत फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये ‘पासपोर्ट व्हॅन पुणे बुक फेस्टिव्हल’ या नावाने मोबाइल पासपोर्ट शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील रहिवाशांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना पासपोर्टशी संबंधित विविध सेवा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे आणि पासपोर्ट अपॉइंटमेंट्सची तारीख जलद उपलब्ध करणे हा उद्देश यामागे आहे.
सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.50 येथे पासपोर्टसंबंधी सर्व सेवा दिल्या जाणार आहेत.
अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज सादर करून अपॉइंटमेंट स्लॉट बुक करणे आवश्यक आहे.
निश्चित अपॉइंटमेंट वेळेच्या किमान 15 मिनिटे आधी रिपोर्ट करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना वयस्क आणि अल्पवयीन दोन्ही प्रकारच्या अर्जदारांसाठी स्वतंत्र चेकलिस्ट उपलब्ध आहे.
अर्जदारांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करावा. त्यानंतर शेड्युल्ड पेजवर जाऊन लोकेशनमध्ये मोबईल व्हॅन निवडून अपॉइंटमेंट निश्चित करावी.